Bigg Boss Marathi: सेफ गेम आणि गॉसिप स्वत:वरच उलटलं! प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? गायिकेचा प्रवास संपणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:06 IST2026-03-14T11:05:36+5:302026-03-14T11:06:08+5:30

लोकप्रिय गायिका असलेल्या आणि बिग बॉसमधून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या प्राजक्ता शुक्रेला घराबाहेर पडावं लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

bigg boss marathi 6 prajakta shukre eliminated from the house | Bigg Boss Marathi: सेफ गेम आणि गॉसिप स्वत:वरच उलटलं! प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? गायिकेचा प्रवास संपणार?

Bigg Boss Marathi: सेफ गेम आणि गॉसिप स्वत:वरच उलटलं! प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? गायिकेचा प्रवास संपणार?

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नववा आठवडा सुरू आहे. आणि या आठवड्यात प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे. एक धक्कादायक एलिमिनेशन या आठवड्यात होणार आहे. ज्यामुळे घरातील सदस्यही आश्चर्यचकित होतील. घरातील काही सदस्यांचा गेम हा हळूहळू मागे पडत असल्याचं दिसत आहे. याचाच फटका एका सदस्याला बसणार आहे. लोकप्रिय गायिका असलेल्या आणि बिग बॉसमधून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या प्राजक्ता शुक्रेला घराबाहेर पडावं लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

'बिग बॉस मराठी'चे अपडेट्स देणाऱ्या एका इन्स्टाग्राम पेजवरुन प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट झाल्याची पोस्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीला बिग बॉसच्या घरात प्राजक्ताचा गेम दिसला होता. या सीझनची ती पहिली कॅप्टन झाली होती. त्यानंतरही घरातील अनेक मुद्द्यांमध्ये बोलताना किंवा टास्कमध्ये रणनीती आखताना प्राजक्ता दिसली होती. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून तिचा गेम मागे पडत चालला होता. घरातील सदस्यांबाबत सोफ्यावर बसून प्राजक्ता फक्त गॉसिप करताना दिसत होती. भाऊच्या धक्क्यावरही रितेशने अनेकदा सांगून तिने गेममध्ये बदल केला नाही. प्रत्येकवेळी ती सेफ खेळताना दिसली. याशिवाय करण सोनावणे घराबाहेर गेल्यानंतर प्राजक्ता टोळीमध्ये सामील झाली होती. तिचा हा गेम प्लॅनही प्रेक्षकांना पटला नव्हता. यामुळे तिला घराचा निरोप घ्यावा लागल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. 

गेल्या आठवड्यात रुचिता जामदारने 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट घेतली होती. चाहते आणि घरातील सदस्यांसाठीही हा मोठा धक्का होता. या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या एलिमिनेशन टास्कमध्ये प्राजक्ता शुक्रे, संकेत पाठक, दिपाली सय्यद, तन्वी कोलते, अनुश्री माने आणि रेवा कौरासे एलिमिनेट झाले होते. यापैकी प्राजक्ताला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. 

Web Title : बिग बॉस मराठी: सेफ गेम उल्टा पड़ा; प्राजक्ता शुक्रे बाहर।

Web Summary : प्राजक्ता शुक्रे का 'बिग बॉस मराठी' का सफर खत्म। उनका सेफ गेम और गॉसिपिंग एलिमिनेशन का कारण बना, जिससे घरवाले हैरान हैं। शुरुआती कप्तानी के बावजूद, हाल के हफ्तों में वह पीछे हटती दिखीं, जिसका उन्हें खामियाजा भुगतना पड़ा।

Web Title : Bigg Boss Marathi: Safe game backfires; Prajakta Shukre eliminated.

Web Summary : Prajakta Shukre's 'Bigg Boss Marathi' journey ends. Her safe gameplay and gossiping led to elimination, surprising housemates. Despite initial captaincy, recent weeks saw her fading into the background, ultimately costing her the show.