"तुम्हाला घमंड आलंय...तुमची वाट लावूनच घराबाहेर जाणार...", शेवटी प्रभूने त्याचे खरे रंग दाखवलेच, विशालला उघड चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:33 IST2026-02-03T16:33:10+5:302026-02-03T16:33:39+5:30

प्रभू आणि विशाल कोटियनमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये प्रभू शेळके आणि विशाल एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. 

bigg boss marathi 6 prabhu shekle and vishal kotian cat fight in house todays promo video | "तुम्हाला घमंड आलंय...तुमची वाट लावूनच घराबाहेर जाणार...", शेवटी प्रभूने त्याचे खरे रंग दाखवलेच, विशालला उघड चॅलेंज

"तुम्हाला घमंड आलंय...तुमची वाट लावूनच घराबाहेर जाणार...", शेवटी प्रभूने त्याचे खरे रंग दाखवलेच, विशालला उघड चॅलेंज

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा चौथा आठवडा सुरू आहे. दिवसेंदिवस घरातील सदस्यांची समीकरणं बदलताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात प्रभू शेळकेचं रुचिता जामदारसोबत वाजलं होतं. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने त्याचा समाचारही घेतला होता. आता या आठवड्यात प्रभू आणि विशाल कोटियनमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये प्रभू शेळके आणि विशाल एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. 

विशाल प्रभूला म्हणतो की तू माझ्यासाठी एवढा महत्त्वाचा नाही. त्यानंतर प्रभू त्याला म्हणतो, "तुम्हाला घमंड आलंय...तुमची बॉडी असून उपयोग नाही". पुढे विशाल त्याला म्हणतो, "तू नॉमिनेटेड आहेस... मला तुला फुटेज द्यायचं नाही". मग प्रभूचा पारा चढतो. तो त्याला नाचून दाखवतो आणि म्हणतो, "मला डॉन म्हणतात डॉन...हलक्यात घ्यायचं नाही. तुमची वाट लावूनच मी घराबाहेर जाणार". या प्रोमोनंतर प्रभूने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केल्याचं चाहत्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. 


या आठवड्यात प्रभू शेळके नॉमिनेटेड आहे. त्याच्यासोबत अनुश्री माने, राकेश बापट, रोशन भजनकर, दिपाली सय्यद, सचिन कुमावत, आयुष संजीव, ओमकार राऊत आणि दिव्या शिंदे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. 

Web Title : बिग बॉस मराठी: प्रभु शेळके ने विशाल कोटियन को खुली चुनौती दी, गरमागरम बहस

Web Summary : बिग बॉस मराठी 6 में प्रभु शेळके और विशाल कोटियन के बीच तनाव बढ़ गया। इस हफ्ते नामांकित प्रभु ने विशाल का सामना किया और परिणाम भुगतने की चेतावनी दी। उनकी गरमागरम बहस में व्यक्तिगत दुश्मनी सामने आई, प्रभु ने विशाल को खुले तौर पर चुनौती दी। प्रोमो में प्रभु के असली रंग दिखाने का संकेत दिया गया है।

Web Title : Bigg Boss Marathi: Prabhu Shelke Challenges Vishal Kotian After Heated Argument

Web Summary : Bigg Boss Marathi 6 witnesses escalating tensions as Prabhu Shelke and Vishal Kotian clash. Prabhu, nominated this week, confronts Vishal, warning of consequences. Their heated exchange reveals personal animosity, with Prabhu challenging Vishal openly. The promo hints at Prabhu showing his true colors.