Bigg Boss Marathi: 'पारू' फेम अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस मराठी ६'मध्ये? 'त्या' पोस्टमुळे रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 11:34 IST2025-11-27T11:33:24+5:302025-11-27T11:34:25+5:30
'बिग बॉस मराठी ६'मध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Bigg Boss Marathi: 'पारू' फेम अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस मराठी ६'मध्ये? 'त्या' पोस्टमुळे रंगली चर्चा
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या पुढच्या पर्वाची नुकतीच घोषणा झाली आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वाचा होस्ट कोण असणार? आणि कोणते स्पर्धक बिग बॉस मराठी ६मध्ये पाहायला मिळणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी ६'मध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सेलिब्रिटींना चाहत्यांनी 'बिग बॉस मराठी ६'मध्ये बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६'मध्ये वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 'लागिर झालं जी', 'जीव माझा गुंतला', 'पारू' या मालिकांमधून प्रसिद्धी मिळवलेली पूर्वा शिंदे बिग बॉसच्या घरात दिसण्याची शक्यता आहे. एका फॅन पेजवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. "बिग बॉस मराठी ६मध्ये कोणाला बघायला आवडेल?" असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि यापोस्टमझ्ये पूर्वा शिंदेचा फोटोही आहे.

पूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळेच 'बिग बॉस मराठी ६'मध्ये पूर्वा दिसू शकते, याबाबत आता चाहते तर्क वितर्क लावत आहेत. खरंच पूर्वा 'बिग बॉस मराठी ६'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होईल का? हे आता पाहावं लागेल. सध्या पूर्वी पारू मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहे.