शक्ती अन् युक्ती दोन्ही कमी पडली; 'बिग बॉस मराठी'च्या घरातून ओमकार राऊतचा प्रवास संपला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 08:44 IST2026-02-09T08:42:14+5:302026-02-09T08:44:21+5:30

'बिग बॉस मराठी'च्या घरातून ओमकार राऊतची EXIT! चार आठवड्यांचा प्रवास संपला

bigg boss marathi 6 omkar raut exit from the show the four week journey is over | शक्ती अन् युक्ती दोन्ही कमी पडली; 'बिग बॉस मराठी'च्या घरातून ओमकार राऊतचा प्रवास संपला 

शक्ती अन् युक्ती दोन्ही कमी पडली; 'बिग बॉस मराठी'च्या घरातून ओमकार राऊतचा प्रवास संपला 

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या सहावा सीझन आता दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. प्रत्येकजण आता  आपला खेळ दाखवू लागला आहे.  
नुकताच काल 'भाऊचा धक्का’च्या एपिसोडमध्ये घरात मोठा धक्का बसला. या आठवड्यात घरात  एकूण नऊ जण  नॉमिनेट होते. त्यात डेंजर झोनमध्ये आयुष - ओमकार आले आणि ओमकार राऊत घराबाहेर गेला. या शोच्या पहिल्याच दिवसापासून ओमकारचा गेम कुठे दिसला नव्हता.रितेश भाऊंच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णायक क्षणाने सदस्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं, तर घरात शांततेसोबतच अस्वस्थतेचं वातावरणही निर्माण झालं. आता येत्या आठवड्यात घरात सदस्यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण घरात काहीतरी असं घडणार आहे ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल, सदस्यांना मोठं सरप्राइज मिळणार आहे. 


या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश भाऊंनी आपल्या खास स्टाईलमध्ये रुचिताला थेट समज देत रुचिता–दिपालीमधील वादावर भाष्य केलं. करण आणि प्राजक्ताच्या कमेंट्रीवरही रितेश भाऊंची स्पष्ट टिपणी पाहायला मिळाली. विशाल आणि टोळीच्या खेळीचं कौतुक करताना, टोळीच्या रणनीतीला दाद देण्यात आली, तर सचिनचे विचार रितेश भाऊंच्या मनाला भिडले आणि हा क्षण घरासाठी भावनिक ठरला.

ओंकारच्या एक्झिटनंतर आता पुढील आठवडा अधिकच निर्णायक ठरणार आहे. कोण सुरक्षित राहणार, कोण असुरक्षित होणार? पुढच्या नॉमिनेशनमध्ये कोणाची नावं पुढे येणार आणि पुढचा प्रवास कोणाचा थांबणार? घरात नवी समीकरणं तयार होणार की जुन्याच वादांना उधाण येणार? आणि सर्वात महत्त्वाचं पुढचा ‘राडा’ नेमका कोण घालणार? या सगळ्याची उत्तरं लवकरच ‘BIGG BOSS मराठी’च्या आगामी एपिसोड्समध्ये मिळणार आहेत.

Web Title : ओमकार राऊत का बिग बॉस मराठी सफर समाप्त: रणनीति और शक्ति विफल!

Web Summary : ओमकार राऊत बिग बॉस मराठी 6 से बाहर हो गए क्योंकि वे प्रभावित करने में विफल रहे। रितेश देशमुख के 'भाऊ चा धक्का' एपिसोड से आत्मनिरीक्षण हुआ। आगामी सप्ताह में आश्चर्य, नए समीकरण और आगे के नाटक का वादा है क्योंकि प्रतियोगिता तेज हो गई है। अगला नामांकन कौन होगा?

Web Title : Omkar Raut's Bigg Boss Marathi Journey Ends: Strategy and Power Failed!

Web Summary : Omkar Raut was evicted from Bigg Boss Marathi 6 after failing to impress. Ritesh Deshmukh's 'Bhau cha Dhakka' episode led to introspection. The upcoming week promises surprises, new equations, and further drama as the competition intensifies. Who will be nominated next?