'बिग बॉस'चा मोठा गेम! राकेश-अनुश्री, रुचिता-तन्वीला अडकवलं जोडीच्या बेडीत, आता काय करणार घरातील सदस्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 10:23 IST2026-02-02T10:23:20+5:302026-02-02T10:23:44+5:30

'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना बेडीत अडकवलं आहे. या आठवड्यात सदस्यांना जोडीच्या बेडीत अडकत टास्क पूर्ण करायचे आहेत. विशेष म्हणजे या जोड्याही बिग बॉसनेच ठरवून दिल्या आहेत. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. 

bigg boss marathi 6 new task rakesh bapat and anushri mane playing together todays promo video | 'बिग बॉस'चा मोठा गेम! राकेश-अनुश्री, रुचिता-तन्वीला अडकवलं जोडीच्या बेडीत, आता काय करणार घरातील सदस्य?

'बिग बॉस'चा मोठा गेम! राकेश-अनुश्री, रुचिता-तन्वीला अडकवलं जोडीच्या बेडीत, आता काय करणार घरातील सदस्य?

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'च्या तिसऱ्या आठवड्यात अभिनेत्री सोनाली राऊत हिने घराचा निरोप घेतला. सोनालीने घरातून एक्झिट घेतल्यानंतर चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात मजेशीर ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना बेडीत अडकवलं आहे. या आठवड्यात सदस्यांना जोडीच्या बेडीत अडकत टास्क पूर्ण करायचे आहेत. विशेष म्हणजे या जोड्याही बिग बॉसनेच ठरवून दिल्या आहेत. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. 

या आठवड्याच्या सुरुवातीलाच बिग बॉसने घरातील स्पर्धकांना मोठा धक्का दिला आहे. प्रोमोमध्ये दिसतंय की बिग बॉस म्हणतात गेले तीन आठवडे आपणा सर्वांना कसलंच बंधन नाही. पण आता बिग बॉस आपल्या सगळ्यांना या क्षणापासून जोड्यांमध्ये अडकवत आहेत. बिग बॉसने दिलेल्या बेड्या घालत सदस्यांना जोडीनेच बिग बॉसच्या घरात फिरायचं आहे. बिग बॉसने राकेश बापट-अनुश्री माने, रुचिता जामदार-तन्वी कोलते, सागर कारंडे-प्रभू शेळके, दिपाली सय्यद-दिव्या शिंदे, ओमकार राऊत-विशाल कोटियन, प्राजक्ता शुक्रे-रोशन भजनदार, करण सोनावणे-आयुष संजीव-सचिन कुमावत अशा जोड्या बिग बॉसने बनवल्या आहेत. 


बिग बॉसने जोड्यांमध्ये अडकवल्यानंतर आता खेळ आणखी मजेशीर झाल्याचं पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये दिसतंय की घरातील सदस्य डायनिंग एरियामध्ये बसले आहेत. तेव्हा राकेश म्हणतो "आता कुठे गेली तुमची टोळी?". 'बिग बॉस'च्या या नव्या टास्कमुळे घरातील समीकरणं बदलतील का हे पाहणं रंजनकारक असणार आहे.

Web Title : बिग बॉस मराठी: नए ट्विस्ट में प्रतियोगी जोड़ी में बंधे; खेल हुआ तीव्र!

Web Summary : बिग बॉस मराठी 6 ने 'जोड़ी' ट्विस्ट पेश किया, जिसमें प्रतियोगियों को एक साथ कार्य पूरा करने के लिए मजबूर किया गया। राकेश-अनुश्री और रुचिता-तन्वी जैसी जोड़ियाँ बिग बॉस द्वारा बनाई गई हैं, जिससे घर की गतिशीलता और गठबंधन हिल गए हैं। इस नई चुनौती के साथ खेल और मनोरंजक होने वाला है।

Web Title : Bigg Boss Marathi: Contestants paired up in new twist; game intensifies!

Web Summary : Bigg Boss Marathi 6 introduces a 'jodi' (pair) twist, compelling contestants to complete tasks together. Pairs like Rakesh-Anushree and Ruchita-Tanvi are formed by Bigg Boss, shaking up house dynamics and alliances. The game is set to become more entertaining with this new challenge.