"तिने केलं तर चालतं,पण...", राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशने सचिनला धरलं धारेवर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 10:46 IST2026-02-21T10:43:56+5:302026-02-21T10:46:38+5:30
/सचिनने राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशचा चढला पारा, थेट विचारला जाब, नेटकऱ्यांना काही रुचेना, म्हणाले-"तिने केलं तर चालतं..."

"तिने केलं तर चालतं,पण...", राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्याने रितेशने सचिनला धरलं धारेवर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चं यंदाचं पर्व सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांचे वाद आणि टास्कमधील त्यांची खेळी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यात अलिकडेच बिग बॉसच्या घरात ड्रामा क्वीन राखी सावंतची एन्ट्री झाल्याने वातावरण आणखीच बदललं आहे. राखीने घरात प्रवेश केल्यापासून खेळ आणखी रंगतदार बनला आहे. दरम्यान, हा शो सुरु होऊन आता सहा आठवडे उलटले आहेत. शिवाय,या सहाव्या आठवड्याच तन्वी कोमलतेच्या हाती कॅप्टनची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. अशातच नुकताच बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो सध्या चर्चेत प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अलिकडेच दोन दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा राडा पाहायला मिळाला. राखीने घरातील काम करायला सांगितल्याने प्राजक्ता आणि तिच्यात वाद झाला होता. या वाद होण्याचं कारण म्हणजे प्राजक्ताने कामे करण्यास नकार दिला होता. त्यानंतर राखी प्राजक्ताच्या तोंडावर पीठ टाकते. प्राजक्ताच्या तोंडावर राखीने पीठ टाकल्यामुळे सचिन आणि सागर राखीसोबत भांडायला जातात मग हा वाद चिघळतो. सचिन, राखीला सुनावतो पण ती ऐकत नाही. राखीने पीठ टाकलं म्हणून सचिन राखीच्या तोंडावर पाणी टाकतो. यावरून भाऊच्या धक्क्यावर आता रितेश देशमुख सचिनची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहे.
दरम्यान, कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की, रितेश सचिनला थेट जाब विचारत म्हणतो, तुम्ही राखीच्या चेहऱ्यावर पाणी फेकलं, पीठ टाकलं. मुळात तुम्ही एका महिलेच्या तोंडावर पाणी कसं फेकू शकता...तुम्ही घरात सचिन भाऊ म्हणून वावरता ना? मग तुमचा आदर कसा राहणार? मला हे खूप खटकलं आहे.
आता सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकऱ्याने या प्रोमोवर कमेंट करत लिहिलं की, 'सचिन भाऊ बरोबर होता' तर दुसऱ्याने लिहिलं, 'बाहेर जायला सचिनचा नंबर लागतोय आता' त्याचबरोबर इतर नेटकऱ्यांनी, ' सचिनने केलं तर चूक', अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.