"लोक पैसे मागायला घरी आले की पप्पा लपायचे...", 'बिग बॉस मराठी'च्या घरात करण सोनावणे भावुक
By कोमल खांबे | Updated: January 14, 2026 14:53 IST2026-01-14T14:52:05+5:302026-01-14T14:53:27+5:30
'बिग बॉस मराठी'च्या घरातील करणचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या आईवडिलांबाबत बोलताना भावुक झाल्याचं दिसत आहे.

"लोक पैसे मागायला घरी आले की पप्पा लपायचे...", 'बिग बॉस मराठी'च्या घरात करण सोनावणे भावुक
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व सुरू होऊन दोन दिवस झाले आहेत. मागच्या पर्वाप्रमाणे या सहाव्या पर्वालाही चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर करण सोनावणेदेखील सहभागी झाला आहे. करणने 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासूनच त्याचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील करणचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या आईवडिलांबाबत बोलताना भावुक झाल्याचं दिसत आहे.
गार्डन एरियामध्ये करण, दिपाली सय्यद आणि ओमकार राऊत गप्पा मारत असल्याचं दिसत आहे. करण दिपालीला सांगतो की "मी आईवडिलांना दुबईला घेऊन गेलो होतो. माझं हे स्वप्न आहे की त्यांना प्रत्येक देश फिरवून आणायचा आहे. दुबईला मी गेलो तेव्हा मी सगळं केलं. मी बुर्ज खलिफामध्ये त्यांच्यासाठी रुम बुक केली होती. आईवडिलांना मी सरप्राइज दिलं की स्कायडायव्हिंग करा. याच्यापेक्षा मोठा अनुभव काय असू शकतो? ४० वर्ष ज्या माणसाने बँकेत नोकरी केली त्यांनी आयुष्यात काय केलं यार... मला लहानपणापासून एक ट्रॉमा आहे. मी पप्पांना बघितलंय काय प्रॉब्लेम होतो जेव्हा लोक पैसे मागायला घरी यायचे तेव्हा पप्पा लपायचे. त्यामुळे मला हे त्यांना कळू द्यायचं नाहीये. मला भविष्यात माझ्या मुलाला त्याला हवंय ते सगळं काही द्यायचंय. पैसा आनंद देऊ शकत नाही असं म्हणतात ते मला खरं वाटत नाही. माझे आईबाबा आता खूश आहेत. पैशाने आनंद विकत घेता येतो, पण कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे.
'बिग बॉस मराठी ६'चे स्पर्धक
दिपाली सय्यद, करण सोनावणे, राकेश बापट, दिव्या शिंदे, विशाल कोटियन, ओमकार राऊत, प्रभू शेळके, सागर कारंडे, तन्वी कोलते, राधा पाटील, रोशन भजनकर, रुचिता जामदार, आयुष संजीव, अनुश्री माने, प्राजक्ता शुक्रे, सोनाली राऊत आणि सचिन कुमावत हे स्पर्धक सहभागी झाले आहेत.