राधा पाटील नाही 'ही' लोकप्रिय नृत्यांगना गाजवणार होती 'बिग बॉस मराठी ६'चं घर, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:43 IST2026-01-22T18:42:12+5:302026-01-22T18:43:08+5:30

राधा पाटीलच्या आधी एका दुसऱ्या अत्यंत लोकप्रिय नृत्यांगनाला 'बिग बॉस'कडून विचारणा झाली होती.

Bigg Boss Marathi 6 Hindavi Patil Rejected Show Offer For Movie | राधा पाटील नाही 'ही' लोकप्रिय नृत्यांगना गाजवणार होती 'बिग बॉस मराठी ६'चं घर, कोण आहे ती?

राधा पाटील नाही 'ही' लोकप्रिय नृत्यांगना गाजवणार होती 'बिग बॉस मराठी ६'चं घर, कोण आहे ती?

'बिग बॉस मराठी'च्या ब्लॉकबस्टर पाचव्या सीझननंतर प्रेक्षक आतुरतेने सहाव्या सीझनची वाट पाहत होते. अखेर सहावा सीझन ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही 'बिग बॉस'चा होस्ट महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजे रितेश देशमुख करतोय. या सीझनमध्ये नृत्यांगना राधा पाटीलने स्पर्धक म्हणून प्रवेश केला आणि ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? राधा पाटीलच्या आधी एका दुसऱ्या अत्यंत लोकप्रिय नृत्यांगनाला 'बिग बॉस'कडून विचारणा झाली होती.

ती नृत्यांगना दुसरी कोणी नसून सोशल मीडिया सेन्सेशन आणि लावणी स्टार हिंदवी पाटील आहे. 'बिग बॉस'च्या टीमकडून दरवर्षी अशा चेहऱ्यांचा शोध घेतला जातो, जे प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकतील. या सीझनसाठी हिंदवी पाटीलला अधिकृतपणे विचारणा करण्यात आली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल हिंदवीने खुलासा केला.

'बिग बॉस'मध्ये जाण्याबद्दल हिंदीवी म्हणाली की, "राधाला माहित होतं, मी बिग बॉसमध्ये जाण्यासाठी फायनल होते. पण, 'जब्राट' सिनेमामुळे मला जाता नाही आलं. या सिनेमाचं शूट सुरू झालं आणि त्यांची तारीख ठरली. तीन दिवसांत मला मुंबईला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी सिनेमा निवडला आणि बिग बॉस सोडलं".


हिंदवी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉसच्या घरात तिची एन्ट्री झाली असती, तर प्रेक्षकांना तिची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली असती.
 

Web Title : राधा पाटिल नहीं, क्या 'बिग बॉस मराठी 6' के लिए पहली पसंद थीं ये?

Web Summary : 'बिग बॉस मराठी 6' के लिए राधा पाटिल से पहले डांसर हिंदावी पाटिल को संपर्क किया गया था। हिंदावी ने खुलासा किया कि फिल्म 'जबराट' की शूटिंग के कारण वह भाग नहीं ले सकीं। उन्होंने रियलिटी शो के बजाय फिल्म को चुना।

Web Title : Radha Patil not first choice for Bigg Boss Marathi 6?

Web Summary : Dancer Hindavi Patil was approached for Bigg Boss Marathi 6 before Radha Patil. Hindavi revealed she couldn't participate due to her film 'Jabrat' shooting schedule. She chose the film over the reality show.