"सागर कारंडेला तू कॉमेडी करतो का? असं विचारणं म्हणजे धोनीला....", मराठी अभिनेत्रीने तन्वी कोलतेला फटकारलं
By कोमल खांबे | Updated: January 16, 2026 11:30 IST2026-01-16T11:29:37+5:302026-01-16T11:30:36+5:30
कॉमेडीचा बादशहा असलेल्या आणि विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सागरला अशाप्रकारे बोलल्याने तन्वीवर चाहत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. तर मराठी अभिनेत्री गायत्री दातार हिनेदेखील तन्वीवर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

"सागर कारंडेला तू कॉमेडी करतो का? असं विचारणं म्हणजे धोनीला....", मराठी अभिनेत्रीने तन्वी कोलतेला फटकारलं
'बिग बॉस मराठी ६' या पर्वात पहिल्याच आठवड्यात घरामध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सी टास्कवरुन बिग बॉसच्या घरातील स्पर्धक एकमेकांना भिडले. तर काही स्पर्धकांची जीभही घसरल्याचं दिसलं. तन्वी कोलतेने कॅप्टन्सी टास्कमध्ये झालेल्या वादात सागर कारंडेच्या प्रोफेशनचा मुद्दा काढला. कॉमेडीवरुन बोलल्याने सागरदेखील भडकला. दिपाली सय्यद, करण सोनावणे आणि घरातील इतर सदस्यांनीही तन्वीला यावरुन विरोध करत चांगलंच सुनावलं. कॉमेडीचा बादशहा असलेल्या आणि विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सागरला अशाप्रकारे बोलल्याने तन्वीवर चाहत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. तर मराठी अभिनेत्री गायत्री दातार हिनेदेखील तन्वीवर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
गायत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत तन्वीला सुनावलं आहे. "सागर कारंडे यांना "कॉमेडी करतो तू? तुला वाटतं कॉमेडी करतो तू?" हे तन्वीने विचारणं म्हणजे धोनीला टीममध्ये सिलेक्टदेखील न झालेल्या खेळाडूने "खेळता येतं का?" असं विचारणं. त्याच्यासारख्या मोठ्या कलाकाराचा अपमान करणं बरोबर नाही. आपण कोणाला काय बोलतोय याचं भान राखावं", असं गायत्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बिग बॉसच्या घरात होणाऱ्या पहिल्या कॅप्टन्सीसाठी प्राजक्ता शुक्रे, तन्वी कोलते, अनुश्री माने आणि सोनाली राऊत यांच्यामध्ये टास्क होणार आहे. यापैकी कोण बिग बॉस मराठी ६च्या घरात पहिल्या कॅप्टन्सीचा बहुमान मिळवतं, हे पाहावं लागेल. तर या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत दिपाली सय्यद, अनुश्री माने, करण सोनावणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, रोशन भजनकर, दिव्या शिंदे आणि राधा पाटील हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.