बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी!'बिग बॉस मराठी-६'मधील 'या' महिला स्पर्धकाला आलेले असे अनुभव, पालकांची झालेली 'अशी'अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:21 IST2026-01-14T14:18:28+5:302026-01-14T14:21:47+5:30
बलात्कार अन् जीवेमारण्याची धमकी! 'त्या' शोनंतर बिग बॉस फेम रुचिता जामदारला आलेला भयानक अनुभव; म्हणाली-"लोक सळो की पळो करून सोडतात..."

बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी!'बिग बॉस मराठी-६'मधील 'या' महिला स्पर्धकाला आलेले असे अनुभव, पालकांची झालेली 'अशी'अवस्था
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या ६ व्या सीझनला दणक्यात सुरुवात झाली आहे. रविवारी ११ डिसेंबरला या शोचा भव्य ग्रॅंड प्रिमिअर पार पडला. यंदाच्या सीझनमध्ये कोल्हापुरची तिखट मिर्ची रुचिता जामदारही सहभागी झाली आहे. रुचिता जामदार तिच्या बेधडक स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.रुचिता 'रोडीज डबल क्रॉस'ची स्पर्धक, 'डान्स महाराष्ट्र डान्स'ची विजेती आणि स्टार प्रवाहच्या 'मी होणार सुपरस्टार'ची पहिली उपविजेती देखील होती. आता 'बिग बॉस मराठी ६'मध्ये कल्ला करण्यासाठी रुचिता सज्ज आहे.
'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत रुचिता जामदारने रोडीजनंतर तिला आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं आहे. त्या शोनंतर रुचिताला बलात्कार आणि जीवेमारण्याच्या धमक्या आल्या होत्या. तो अनुभव शेअर करताना रुचिता म्हणाली, "आजही माझ्या आयुष्यातील तो काळ आठवला की अंगावर काटा येतो. कारण तो माझ्या आयु्ष्यातील खूप घाणेरडा काळ होता. मी घरच्यांच्या पाठिंब्याने, मेहनतीने त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचले आणि मी खरंच खूप खुश होते. इतका मोठा प्लॅटफॉर्म मला मिळाला हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती."
मग रुचिता म्हणाली,"काही लोक कधी-कधी इतक्या खालच्या थराला जातात की, ते तुम्हाला सळो की पळो करून सोडतात. म्हणजे लोकं मला हत्यारे वगैरे डीएम्सला पाठवायचे. तुला आम्ही मारू वगैरे असे मेसेज यायचे. त्यामुळे मला घरचे मुलाखती असो किंवा कोणता कार्यक्रम असेल तर त्यासाठी मुंबई किंवा पुण्याला पाठवायचे नाहीत. त्यांना कायम भीती वाटायची.आपल्या मुलीला काहीतरी होईल, याच विचारात ते असायचे. त्या वादानंतर मी खूप रडले.मला त्या शोमधून बाहेर पडायचं होतं. कारण, तो प्लॅटफॉर्म असा होता की, त्यामधील बरेच लोक हिंदी भाषिक होते. ते लोक पंजाबी किंवा हरयाणाचे होते. मला त्यांचं बोलणं काही कळायचं नाही, सगळं डोक्यावरून जायचं. त्यात मी एकटीच मराठी होते.त्याच्यामुळे रोडीजमध्ये माझा एक वेगळा गेम दिसला.पण,आपण एकटे असलो तरी भिडायचं असा विचार करणारी मी होते."
लोक काहीही बोलतात...
"मला असं वाटतं, रोडीज,स्ल्पिट्सव्हिला याचा जो ऑडियन्स आहे हा तरुणवर्ग आहे.हे लोक रिअॅलिटी शो खूप मनावर घेतात. त्यांना असं वाटतं... अरे, आमच्या स्टारला ही अशी का बोलली. त्याच्या नादात हे लोक काहीही बोलतात. मला अनेकदा चेहऱ्यावरून, बॉडीवरून खूप काही बोलेले आहे. पण, माझा प्रेक्षकवर्ग हा शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिला."