आधी तलवारीने मारण्याची धमकी, आता 'बिग बॉस मराठी'च्या घरातून Exit घेतल्यानंतर दिव्या शिंदे म्हणते- "लवकरच तुमच्यासोबत..."
By कोमल खांबे | Updated: February 7, 2026 11:32 IST2026-02-07T11:31:50+5:302026-02-07T11:32:22+5:30
नॅशनल टेलिव्हिजनवर तलवार चालवण्याची धमकी दिल्यामुळे बिग बॉसने दिव्या शिंदेला बाहेरचा रस्ता दाखवला. बिग बॉसच्या या निर्णयामुळे चाहत्यांसोबतच घरातील स्पर्धकांनाही मोठा धक्का बसला आहे. बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर दिव्या शिंदेने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

आधी तलवारीने मारण्याची धमकी, आता 'बिग बॉस मराठी'च्या घरातून Exit घेतल्यानंतर दिव्या शिंदे म्हणते- "लवकरच तुमच्यासोबत..."
Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या कालच्या भागात धक्कादायक घटना घडली. नॅशनल टेलिव्हिजनवर तलवार चालवण्याची धमकी दिल्यामुळे बिग बॉसने दिव्या शिंदेला बाहेरचा रस्ता दाखवला. दिव्याने स्पर्धकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने बिग बॉसने दंड स्वरुपात शिक्षा सुनावत दिव्याला थेट घराबाहेर काढलं. बिग बॉसच्या या निर्णयामुळे चाहत्यांसोबतच घरातील स्पर्धकांनाही मोठा धक्का बसला आहे. बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर दिव्या शिंदेने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
दिव्याच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर करण्यात आली आहे. दिव्याच्या टीमकडून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की "बिग बॉस मराठीच्या घरातून दिव्याने एक्झिट घेतल्यानंतर आपल्यापैकी अनेक जण भावुक झाले आहेत तर काहींना धक्का बसला आहे हे आम्हाला माहीत आहे. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सर्व काही आहे. त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्ही सगळ्यांना विनंती करू इच्छितो की कृपया शांत राहा आणि कोणतीही नकारात्मकता किंवा चुकीची माहिती पसरवू नका. लवकरच तुमच्यासोबत अनेक गोष्टी शेअर करणार आहोत. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच दिली जातील".

नेमकं काय घडलं?
'बिग बॉस मराठी ६'मध्ये नॉमिनेशनचा टास्क झाला. यात घरात सहभागी नसलेल्या सदस्याच्या चेहऱ्यावर लाल रंगाने क्रॉस चिन्ह काढायचं होतं. यामध्ये तन्वीने दिव्याचं नाव घेतलं. दिव्याला हे ऐकताच राग अनावर झाला. तिने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना उद्देशून तलवार चालवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. बिग बॉसने तिला रोखलं तरीही दिव्या ऐकत नव्हती. ''हो ही धमकीच आहे'', असं दिव्या वारंवार म्हणत राहिली. परिणामी, बिग बॉसने दिव्या आणि राकेश बापटला कन्फेशन रुममध्ये बोलावलं. झालेली चूक सुधारण्याची दिव्याला बिग बॉसने संधी दिली. परंतु दिव्या तिच्या म्हणण्यावर ठाम होती. त्यामुळे सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बिग बॉसने दंड म्हणून दिव्याला तातडीने घरातून बाहेर काढलं.
'बिग बॉस मराठी ६'च्या घरात आज हाय वोल्टेज ड्रामा घडला. दिव्या घरातील स्ट्राँग स्पर्धक होती. परंतु स्वतःच्या भाषेवर नियंत्रण न राहिल्याने आणि नॅशनल टेलिव्हिजनवर धमकी दिल्याने 'बिग बॉस मराठी ६'मधून दिव्या शिंदेला बाहेर जावं लागलं.