Video: "लोक रंग बदलताना दिसत आहेत...", दिव्यामुळे दिपाली सय्यद आणि राकेश बापटच्या मैत्रीत फूट, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:56 IST2026-01-29T13:55:51+5:302026-01-29T13:56:41+5:30

आता घट्ट वाटणारी दिपाली आणि राकेशची मैत्रीही तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. एकमेकांसाठी उभे राहणारे, प्रत्येक टास्कमध्ये पाठिंबा देणारे हे दोन सदस्य आता समोरासमोर भिडताना दिसत आहेत.

bigg boss marathi 6 dipali sayyed and rakesh bapat friendship is over todays promo | Video: "लोक रंग बदलताना दिसत आहेत...", दिव्यामुळे दिपाली सय्यद आणि राकेश बापटच्या मैत्रीत फूट, नेमकं काय घडलं?

Video: "लोक रंग बदलताना दिसत आहेत...", दिव्यामुळे दिपाली सय्यद आणि राकेश बापटच्या मैत्रीत फूट, नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi 6:‘बिग बॉस मराठी’च्या घरातील समीकरणं आता हळूहळू बदलत असल्याचं दिसत आहे. पहिल्याच दिवशी मैत्रिणी झालेल्या रुचिता आणि तन्वी यांच्या मैत्रीत पहिल्या आठवड्यानंतर फूट पडल्याचं दिसलं. आता घट्ट वाटणारी दिपाली आणि राकेशची मैत्रीही तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. एकमेकांसाठी उभे राहणारे, प्रत्येक टास्कमध्ये पाठिंबा देणारे हे दोन सदस्य आता समोरासमोर भिडताना दिसत आहेत. नेमकं असं काय घडलं की या मैत्रीत दुरावा निर्माण झाला? 

बिग बॉसच्या घरातील नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दिसतंय की एका मुद्द्यावरून सुरू झालेला वाद हळूहळू गंभीर वळण घेतो. राकेश दिपालीवर थेट आरोप करताना दिसतो, तर दिपालीही शांत न राहता स्पष्ट शब्दांत आपली बाजू मांडते. राकेश दीपालीला म्हणाला, "रंग बदलताना दिसत आहेत लोकं...".  त्यावर दीपाली म्हणाली, "रंग बदलताना मला त्यादिवशीच दिसलं नॉमिनेशनच्या वेळी". राकेश म्हणाला, "दिव्या माझी बहीण आहे. मी तिला सपोर्ट करणार". त्यावर दीपालीने प्रश्न विचारला, "मी तुझी मैत्रीण नव्हते ? तू neutral राहायला हवं होतंस. प्रत्येकजण स्वतःसाठी खेळत आहे इकडे". त्यावर राकेश  म्हणाला, "थॅंकलेस असतात लोकं... ".


तीव्र वादामुळे घरातलं वातावरण बदलून जाणार का? इतर घरसदस्यही यावर प्रतिक्रिया देताना दिसणार का ? ही मैत्री कायमची संपणार की पुन्हा एकदा मैत्री होणार? की हा वाद खेळाला आणखी रंगतदार बनवणार? हे आता पाहावं लागेल.

Web Title : बिग बॉस मराठी: क्या दीपाली और राकेश की दोस्ती टूटने वाली है?

Web Summary : बिग बॉस मराठी में दीपाली और राकेश के रिश्ते में दरार। रंग बदलने के आरोप और वफादारी में बदलाव। क्या यह झगड़ा खेल को बदल देगा, या वे सुलह कर पाएंगे?

Web Title : Bigg Boss Marathi: Dipali and Rakesh's friendship at breaking point?

Web Summary : Arguments erupt in Bigg Boss Marathi, straining Dipali and Rakesh's bond. Accusations of changing colors fly as loyalties shift. Will this feud reshape the game, or can they reconcile?