Bigg Boss Marathi 6 Contestant: 'बिग बॉस मराठी'चं वातावरण होणार टाईट! घरात पहिल्यांदाच होणार डॉनची एन्ट्री, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:55 IST2026-01-09T13:54:51+5:302026-01-09T13:55:14+5:30
Bigg Boss Marathi 6 Contestants: 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एक डॉनदेखील एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. कलर्स मराठीकडून 'बिग बॉस मराठी ६'च्या एका स्पर्धकाबाबत हिंट देण्यात आली आहे.

Bigg Boss Marathi 6 Contestant: 'बिग बॉस मराठी'चं वातावरण होणार टाईट! घरात पहिल्यांदाच होणार डॉनची एन्ट्री, कोण आहे तो?
Bigg Boss Marathi 6 Contestants:रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस मराठी ६' हे नवं पर्व ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. काही स्पर्धकांची नावंही समोर आली आहेत. 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एक डॉनदेखील एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. कलर्स मराठीकडून 'बिग बॉस मराठी ६'च्या एका स्पर्धकाबाबत हिंट देण्यात आली आहे. बिग बॉस मराठीच्या टीमकडून एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन नव्या स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये या स्पर्धकाची झलक दिसत आहे. या व्हिडीओतून 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात जाणाऱ्या या स्पर्धकाबाबत मोठी हिंटही देण्यात आली आहे. "या डॉनचं नाव जरी घेतलं तरी पब्लिक थरथर कापते...आता हाच दरारा घेऊन तो बिग बॉस मराठीच्या घरात येतोय! या डॉनला ओळखलंत का?" असं कॅप्शनमध्ये म्हटलं गेलं आहे. 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात जाणारा हा स्पर्धक नक्की कोण आहे याबाबत चाहत्यांनी कमेंटमध्ये अंदाज बांधला आहे.
काहींनी हिंदुस्तानी भाऊचं नाव घेतलं आहे. तर अनेकांनी सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या सनी वाघचोरे याला टॅग केलं आहे. आता हा स्पर्धक नक्की कोण आहे ते 'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड प्रिमियरलाच कळेल. दरम्यान, 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातील काही स्पर्धकांची नावं कन्फर्म झाली आहे. आयुष संजीव, राकेश बापट, राधा पाटील मुंबईकर, करण सोनावणे, अनुश्री माने या नावांवर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.