Bigg Boss Marathi: 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता 'बिग बॉस मराठी'मध्ये दिसणार? म्हणतो- "गंमत झाली आता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:54 IST2026-01-02T09:53:14+5:302026-01-02T09:54:14+5:30
'बिग बॉस मराठी ६'च्या स्पर्धकांबाबत सोशल मीडियावर दमदार चर्चा रंगली असून अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. आता अशातच 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Bigg Boss Marathi: 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता 'बिग बॉस मराठी'मध्ये दिसणार? म्हणतो- "गंमत झाली आता..."
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी ६'च्या स्पर्धकांबाबत सोशल मीडियावर दमदार चर्चा रंगली असून अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. आता अशातच 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात दिसणार असल्याचं बोललं जात आहे. हा अभिनेता म्हणजे प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा सागर कारंडे आहे.
सागर कारंडेने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की "गंमत झाली आता ***- जंमत होणार. लवकरच तुमच्या भेटीला". या पोस्टला त्याने "लवकरच तुमच्या भेटीला २०२६" असं कॅप्शनही दिलं आहे. सागर कारंडेच्या या पोस्टमागे नेमकं काय दडलंय याचा चाहते अंदाज बांधत आहेत. त्याच्या या पोस्टमुळे सागर 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. मात्र त्याने ही पोस्ट नेमकी कशाबाबत केली आहे, हे अद्याप समजलेलं नाही. कारण सागरचं 'हीच खरी फॅमिलीची गंमत आहे' हे नाटकही सध्या सुरू आहे. त्यामुळे अभिनेत्याने केलेली ही पोस्ट नाटकाबाबत आहे की 'बिग बॉस मराठी ६'बाबत हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल.
दरम्यान, 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझनही रितेश देशमुख होस्ट करणार आहे. यंदाच्या सीझनची थीमही खास असणार आहे. रितेशभाऊ त्याच्या स्टाइलने भाऊच्या धक्क्यावर घरातील स्पर्धकांचे मुखवटे उतरवताना दिसेल. येत्या ११ जानेवारीपासून 'बिग बॉस मराठी ६' हे नवं पर्व सुरू होत आहे. कलर्स मराठीवर रात्री ८ वाजता प्रेक्षकांना हा नवा सीझन पाहता येणार आहे.