Bigg Boss Marathi 6: धक्कादायक Eviction! 'हे' दोन स्पर्धक घराबाहेर जाणार? नावं वाचून थक्कच व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:54 IST2026-02-14T13:52:38+5:302026-02-14T13:54:09+5:30
'बिग बॉस मराठी ६'च्या घरात राकेश बापट, करण सोनावणे, सचिन कुमावत, प्रभू शेळके, आयुष संजीव आणि प्राजक्ता शुक्रे. आता या सहा जणांपैकी या आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर जाणार, अशी चर्चा आहे.

Bigg Boss Marathi 6: धक्कादायक Eviction! 'हे' दोन स्पर्धक घराबाहेर जाणार? नावं वाचून थक्कच व्हाल
'बिग बॉस मराठी ६'ची सध्या खूप चर्चा आहे. या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार अशी सर्वांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात या आठवड्यात जो नॉमिनेशन टास्कमध्ये झाला त्यात एकूण सहा स्पर्धक नॉमिनेट झाले. राकेश बापट, करण सोनावणे, सचिन कुमावत, प्रभू शेळके, आयुष संजीव आणि प्राजक्ता शुक्रे. आता या सहा जणांपैकी या आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर जाणार, अशी चर्चा आहे.
हे दोन स्पर्धक गेले घराबाहेर
'बिग बॉस मराठी ६'मधून नॉमिनेट असलेल्या सहा स्पर्धकांपैकी आयुष संजीव आणि करण सोनावणे यांना घराबाहेर जावं लागलं अशी चर्चा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे. 'बिग बॉस मराठी ६'चे जे सोशल मीडियावर खबरी पेज आहेत त्यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय असंही सांगितलं जातंय, आयुष संजीव घराबाहेर गेला असून करण सोनावणेला सीक्रेट रुममध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या आठवड्यात 'बिग बॉस मराठी ६'च्या खेळात मोठा ट्विस्ट बघायला मिळेल यात शंका नाही.
आयुष संजीव गेल्या दोन आठवड्यापासून खेळात काहीसा कमी पडतोय. गेल्या आठवड्यात तब्येतीच्या कारणास्तव आयुष टास्कमध्ये सहभागी झाला नाही. तो अंथरुणावर झोपून होता. याशिवाय या आठवड्यात जो टास्क झाला, त्यावेळी आयुषने मला यापुढे कॅप्टन व्हायचं नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. बिग बॉस त्याच्यावर चांगलेच चिडले होते. त्यामुळे कमी वोट्स मिळाल्याने आयुष घराबाहेर गेला तर त्याचे फॅन्स नक्कीच नाराज होतील. दुसरीकडे करण सोनावणे घराबाहेर जाणार की सीक्रेट रुममध्ये राहणार हे उद्याच्या भागात कळून येईलच