"तिने जरा जास्तच अभ्यास केलाय...", सागर कारंडेवर आवाज चढवणाऱ्या तन्वीला मराठी अभिनेत्रीने धरलं धारेवर, म्हणाली-"ज्या पद्धतीने तिने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 14:11 IST2026-01-15T14:09:16+5:302026-01-15T14:11:00+5:30
सागर कारंडेसोबत वाद घालणाऱ्या तन्वीला मराठी अभिनेत्रीने सुनावलं, म्हणाली-"ज्या पद्धतीने तिने तिचं रंगरूप दाखवलं..."

"तिने जरा जास्तच अभ्यास केलाय...", सागर कारंडेवर आवाज चढवणाऱ्या तन्वीला मराठी अभिनेत्रीने धरलं धारेवर, म्हणाली-"ज्या पद्धतीने तिने..."
Bigg Boss Marathi Season 6 : 'बिग बॉस' मराठीचा सहावा सीझन सुरु होऊन काहीच दिवस झाले आहेत.यंदाच्या पर्वात सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरपासून ते कलाकार मंडळी देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. हळूहळू या पर्वातील प्रत्येक सदस्य प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत आहे.कोणता स्पर्धक कसा आहे याबद्दल प्रेक्षकांनाही थोडेफार कल्पना येऊ लागली आहे.सेलिब्रिटींसह अनेकजण हा शो फॉलो करतात तसेच मोठ्या आवडीने पाहतात. इतकंच नाही शोमध्ये घडणाऱ्या घटना आणि स्पर्धकांच्या वर्तवणुकीबद्दल देखील प्रतिक्रिया देत असतात. अशातच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील स्पर्धक सोनाली पाटीलने शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
अलिकडेच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला.या टास्टमध्ये तन्वी थेट सागर कारंडेचं नाव घेत त्याला नॉमिनेट केलं.तन्वीने सागर कारंडेला नॉमिनेट केल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा तन्वीने सागरला अरे तुरे केल्याने चाहते भडकले आहेत. हा सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर आता अभिनेत्री सोनाली पाटीलने प्रतिक्रिया देत तन्वी कोलतेला चांगलंच सुनावलं आहे. सोनालीने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर याबाबत व्हिडीओ शेअर करत त्यामध्ये म्हटलंय," मित्रांनो, बिग बॉस सीझन ६ सगळेच बघत आहेत. आजचा प्रोमो आल्यानंतर आणि एपिसोडही पाहिला. त्यामध्ये ज्या पद्धतीने तन्वी कोलतेने तिचं रंगरूप दाखवलं आहे... ही गोष्ट बाजूला ठेवूया. पण, ज्या वेळेला ती सागर कारंडेवर इतक्या जोरात ओरडली... काहीही कारण नसताना ओरडली. त्याला बोलूच देत नव्हती. सागरने आजवर खूप काम केलं आहे. पण त्याचा विचार न करता तन्वीचा टोन जरा जास्तच होता. कदाचित तिने जरा जास्तच बिग बॉसच्या आणि बिग बॉस हिंदीच्या नोट्सचा अभ्यास केलेला आहे. किंवा अशा काही व्यक्तींना ती भेटली आहे. पण, तन्वीने पहिल्याच दिवसापासून काय रुप धारण केलं आहे, काहीच कळत नाहीये.
त्यानंतर सोनाली सांगर कारंडेच्या अंदाजात मिमिक्री करते म्हणते, रितेश दादा करतायेत 'बिग बॉस मराठी ६' चा सीझन शो होस्ट... आता कोलतेला सगळेच करणार रोस्ट. भाऊच्या धक्क्यावर तन्वीचा होणार टोस्ट...म्हणून मी करतेय पोस्ट. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "बरोबर बोललीस...ती सागर दादाला खूप चुकीचं बोलली",अशा प्रतिक्रिया प्रेक्षक या व्हिडीओवर देत आहेत.