'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार ही मराठी अभिनेत्री? तेलुगु सिनेमात केलंय काम, प्रोमोमुळे चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:57 IST2025-11-25T11:55:08+5:302025-11-25T11:57:06+5:30
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी ६'ची घोषणा झाली असून लवकरच हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 'बिग बॉस मराठी ६'मधलं पहिलं नाव समोर आलं आहे.

'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार ही मराठी अभिनेत्री? तेलुगु सिनेमात केलंय काम, प्रोमोमुळे चर्चेला उधाण
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस १९' हा सीझन अंतिम टप्प्यात आला आहे. हा सीझन संपत असतानाच आता 'बिग बॉस मराठी'च्या पुढच्या पर्वाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'बिग बॉस मराठी ६'ची घोषणा झाली असून लवकरच हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी ६'चा प्रोमोही शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. आता यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
'बिग बॉस मराठी ६'मधलं पहिलं नाव समोर आलं आहे. कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडियावरुन 'बिग बॉस मराठी ६'चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोवर कमेंट करत चाहत्यांनी 'बिग बॉस मराठी'मध्ये यंदा कोणते स्पर्धक दिसतील याचा अंदाज बांधला आहे. यातच एका अभिनेत्रीच्या नावाचीही चर्चा होते आहे. एक मराठी अभिनेत्री 'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसण्याची शक्यता व्यक्त होते आहे. तसंच चाहत्यांनीही या अभिनेत्रीला 'बिग बॉस मराठी ६'मध्ये बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ही अभिनेत्री म्हणजे सारिका साळुंखे. चाहत्यांनी 'बिग बॉस मराठी ६'च्या प्रोमोमध्ये सारिकाचं नाव टॅग केलं आहे. त्यामुळे ती 'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार का? याबाबत आता चाहते उत्सुक आहेत. सारिका ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने काही मालिकांमध्ये काम केलं आहे. 'पिंकीचा विजय असो' मालिकेत ती दिसली होती.
याशिवाय काही वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे. एजाज खानच्या हाऊस अरेस्ट या रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. वरदराजू गोविंदम या तेलुगु सिनेमातून तिने साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. सारिकाचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे तिला 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.