Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस हिंदी'नंतर आता मराठीच्या घरात दिसणार एजे! राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६'मधली एन्ट्री कन्फर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:10 IST2026-01-07T18:09:13+5:302026-01-07T18:10:14+5:30
Bigg Boss Marathi 6 Contestants: 'बिग बॉस मराठी ६'मध्ये अभिनेता राकेश बापट दिसणार आहे. नवरी मिळे हिटलरला फेम राकेश बापटची निवड जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस हिंदी'नंतर आता मराठीच्या घरात दिसणार एजे! राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६'मधली एन्ट्री कन्फर्म
Bigg Boss Marathi 6 Contestants: 'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व सुरू होण्यासाठी काहीच दिवस बाकी राहिले आहेत. या सहाव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावरुन पहिल्या स्पर्धकाचा प्रोमोही शेअर करण्यात आला आहे. तर सोशल मीडियावर काही नावांची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच 'बिग बॉस मराठी ६'मधील एक स्पर्धक कन्फर्म झाला आहे.
'बिग बॉस मराठी ६'मध्ये अभिनेता राकेश बापट दिसणार आहे. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६'मधील एन्ट्री कन्फर्म करण्यात आली आहे. नवरी मिळे हिटलरला फेम राकेश बापटची निवड जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राकेश बापटच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. याआधी राकेश बिग बॉस हिंदीमध्येही दिसला होता. त्यानंतर त्याने नवरी मिळे हिटलरला या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेत तो एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार या भूमिकेत होता. अद्याप याबाबत राकेश किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, ११ जानेवारीपासून 'बिग बॉस मराठी ६' हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात राकेश बापटसह सागर कारंडे, दिपाली सय्यद, अनुश्री माने, राधा मुंबईकर, संकेत पाठक, प्राजक्ता शुक्रे, रसिका जामसुदकर या नावांची चर्चा आहे. आता यापैकी कोणते स्पर्धक 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री घेतात हे लवकरच कळेल.