बिग बॉस हिंदीमध्ये जाणार का? महाविजेता सूरज चव्हाण स्पष्टच म्हणाला- "हिंदी करु शकत नाही कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 11:25 IST2024-10-09T11:25:17+5:302024-10-09T11:25:51+5:30
सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीनंतर हिंदीमध्ये जाणार का याविषयी त्याने त्याचं मत व्यक्त केलंय (suraj chava, bigg boss marathi 5)

बिग बॉस हिंदीमध्ये जाणार का? महाविजेता सूरज चव्हाण स्पष्टच म्हणाला- "हिंदी करु शकत नाही कारण..."
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा विजेता सूरज चव्हाण सध्या चांगलाच चर्चेत आहे. सूरजने नवीन सीझनचं विजेतेपद पटकावून सर्वांचं मन जिंकलं. सूरजने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकत भरघोस मतांनी बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचं विजेतेपद पटकावलं आहे. बिग बॉस मराठी गाजवून बिग बॉस हिंदीची ऑफर आली तर जाणार का, असा प्रश्न सूरजला विचारण्यात आला. त्यावेळी सूरजने स्पष्टपणे त्याच्या मनातील भावना सांगितल्या.
बिग बॉस हिंदीबद्दल सूरजचं स्पष्ट मत
नवशक्ति चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सूरज चव्हाण हिंदी बिग बॉसमध्ये जाणार का याबद्दल म्हणाला, "मला इच्छा नाही. आपला मराठी बिग बॉस सगळ्यात सुंदर आणि चांगला. हा बिग बॉस माझ्यासाठी लयच भारी. हिंदी का नाही करु शकत कारण हिंदी मला बोलायला येत नाय आणि समजणार पण नाय. मराठी भाषेने मला समजून घेतलंय. आपली मराठी भाषा लय भारी आहे. आपली मराठीच माणसं लय क्वालिटी आहेत."
पुढे याच मुलाखतीत सूरजला केदार शिंदेंच्या नवीन सिनेमाच्या ऑफरबद्दल त्याचं मत व्यक्त केलं. सूरज म्हणाला, "त्या झापुकझुपुकचा हिरो मी आहे ना त्यामुळे मला आनंद झाला. सरांनी आपलं नाव घेतलं हे ऐकून मला आनंदच झाला." अशाप्रकारे सूरजने त्याचं मत व्यक्त केलंय. सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी ५' चा महाविजेता झाला. सूरजला १४ लाख रुपयांची प्राइज मनी मिळाली याशिवाय त्याच्यावर इतरही बक्षीसांचा वर्षाव झाला.