'बिग बॉस'च्या घरात सूरजचा कल्ला, परदेशी गर्लबरोबर केला डान्स, तिला म्हणतो- "तू किंग कोब्रा अन् मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 10:53 IST2024-08-02T10:53:19+5:302024-08-02T10:53:59+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : बिग बॉसच्या घरात सूरजचं एक वेगळंच रूप पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील सूरजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो इरिनाबरोबर डान्स करताना दिसत आहे. इरिनालाही तो डान्स करायला सांगत आहे.

bigg boss marathi 5 suraj chavan dance with irina rudakova video goes viral | 'बिग बॉस'च्या घरात सूरजचा कल्ला, परदेशी गर्लबरोबर केला डान्स, तिला म्हणतो- "तू किंग कोब्रा अन् मी..."

'बिग बॉस'च्या घरात सूरजचा कल्ला, परदेशी गर्लबरोबर केला डान्स, तिला म्हणतो- "तू किंग कोब्रा अन् मी..."

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व सुरू होऊन ५ दिवस झाले आहेत. या पाचच दिवसात घरातील अनेक सदस्यांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत. यंदाच्या पर्वात रीलस्टार सूरज चव्हाण आणि परदेशी गर्ल इरिना रुडाकोवा हिनेदेखील एन्ट्री घेतली आहे. गुलिगत धोका म्हणत फेमस झालेला सूरज बिग बॉसच्या घरात मात्र शांत शांत दिसत होता. त्यामुळे बिग बॉसने त्याला बोलवत कानमंत्र दिला. त्यानंतर बिग  बॉसच्या घरात एक वेगळाच सूरज पाहायला मिळत आहे. 

बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये सूरजला बोलवत "कोणालाही घाबरुन खेळण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात, तसेच राहा", असं सांगितलं. त्यानंतर मात्र बिग बॉसच्या घरात सूरजचं एक वेगळंच रूप पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील सूरजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो इरिनाबरोबर डान्स करताना दिसत आहे. इरिनालाही तो डान्स करायला सांगत आहे. त्यानंतर सूरज प्राण्यांचे आवाज काढताना दिसत आहे. त्यावर इरिना त्याला म्हणते की मी किंग कोब्रा आहे. तेव्हा सूरज तिला म्हणतो, "तू किंग कोब्रा तर मी शेर आहे". 


दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार हे येत्या वीकेंडला कळेल. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण

Web Title: bigg boss marathi 5 suraj chavan dance with irina rudakova video goes viral