"बिग बॉसच्या घरात येताच तुम्ही Mr India झालात...", निक्की-अरबाजशी पंगा घेणाऱ्या संग्रामची रितेशकडून कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 12:54 IST2024-09-14T12:53:16+5:302024-09-14T12:54:13+5:30

घरात येताच संग्रामने अरबाज आणि निक्कीशी थेट पंगा घेतला होता. त्यामुळे त्याचं कौतुकही होत होतं. मात्र, त्यानंतर संग्राम घरात फारसा दिसला नाही. यावरुन रितेश संग्रामची शाळा घेणार आहे.

bigg boss marathi 5 ritesh deshmukh to take class of sangram choughule said you become mr india in house | "बिग बॉसच्या घरात येताच तुम्ही Mr India झालात...", निक्की-अरबाजशी पंगा घेणाऱ्या संग्रामची रितेशकडून कानउघाडणी

"बिग बॉसच्या घरात येताच तुम्ही Mr India झालात...", निक्की-अरबाजशी पंगा घेणाऱ्या संग्रामची रितेशकडून कानउघाडणी

Bigg Boss Marathi Season 5 : या आठवड्याच्या बिग बॉस मराठीच्या घरात राडा झाला आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्रीपासून ते टास्कदरम्यान हिंसा अशा अनेक गोष्टी या आठवड्यात घडल्या. याबाबत भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घरातील सदस्यांचा समाचार घेणार आहे. त्यामुळे यंदाचा भाऊचा धक्का खास असणार आहे. आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावल्याने रितेश तिला जाब विचारणार आहे. तर वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेल्या संग्रामची रितेश कानउघाडणी करताना दिसणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात पहिल्या वाइल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झाली. बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. संग्रामच्या एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. घरात येताच त्याने अरबाज आणि निक्कीशी थेट पंगा घेतला होता. त्यामुळे त्याचं कौतुकही होत होतं. मात्र, त्यानंतर संग्राम घरात फारसा दिसला नाही. यावरुन रितेश संग्रामची शाळा घेणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. 


या व्हिडिओत रितेश संग्रामला म्हणतो, "संग्राम तुम्ही मिस्टर युनिव्हर्स आहात. पण, बिग बॉसच्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया बनून राहत आहात. तुम्ही दिसतच नाही. महाराष्ट्राची अशी अपेक्षा होती की या घरात एक वाइल्ड कार्ड यावा. जो हा अख्खा गेम पलटवून टाकेल. पण, या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड नाही तर माइल्ड कार्ड आहात". 

'बिग बॉस मराठी'च्या घरात या आठवड्यात अग्रेशनच्या सगळ्या सीमा पार करण्यात आल्या. धक्काबुक्कीत आर्याला निक्कीचा हात लागला. त्यानंतर आर्याचा संयम सुटला आणि आता मारेल असं म्हणत तिने निक्कीच्या कानशिलात लगावली. आर्याने बिग बॉसच्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आता तिला काय शिक्षा मिळणार हे पाहावं लागेल.
 

Web Title: bigg boss marathi 5 ritesh deshmukh to take class of sangram choughule said you become mr india in house