सूरज चव्हणच्या घरी पोहोचला 'बिग बॉस'चा स्पर्धक, दाखवला त्याच्या आईवडिलांचा फोटो, म्हणतो- "भावुक झालोय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 10:47 IST2024-09-28T10:46:26+5:302024-09-28T10:47:06+5:30

बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आले होते. सूरजच्या बहिणी आणि आत्याने बिग बॉसच्या घरातील त्यांच्या कृतीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आता सूरजच्या आईवडिलांचा फोटो समोर आला आहे.

bigg boss marathi 5 purshottam dada patil shared suraj chavan mother father photo watch video | सूरज चव्हणच्या घरी पोहोचला 'बिग बॉस'चा स्पर्धक, दाखवला त्याच्या आईवडिलांचा फोटो, म्हणतो- "भावुक झालोय..."

सूरज चव्हणच्या घरी पोहोचला 'बिग बॉस'चा स्पर्धक, दाखवला त्याच्या आईवडिलांचा फोटो, म्हणतो- "भावुक झालोय..."

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत होता. बिग बॉस मराठीच्या घरात सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने एन्ट्री घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, पहिल्या दिवसापासूनच सूरजला चाहत्यांचा फूल सपोर्ट मिळाला. रीलस्टार म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या सूरजला त्याच्या आयुष्यात मात्र अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरपलेल्या सूरजला त्याच्या बहिणींनी मोठं केलं. अनेकदा बिग बॉसच्या घरातही सूरज आईवडिलांबाबत बोलताना भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

नुकताच बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आले होते. सूरजच्या बहिणी आणि आत्याने बिग बॉसच्या घरातील त्यांच्या कृतीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आता सूरजच्या आईवडिलांचा फोटो समोर आला आहे. बिग बॉस मराठी ५ मधील माजी स्पर्धक असलेले पुरषोत्तम दादा पाटील यांनी सूरजचे आईवडील कसे दिसायचे हे त्याच्या चाहत्यांसमोर आणलं आहे. पुरषोत्तम दादा पाटील यांनी सूरजच्या आत्याची भेट घेतली. याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

या व्हिडिओतून त्यांनी सूरजचं कौतुक करत त्याच्या आईवडिलांचा फोटो दाखवला आहे. "आता मी सूरजच्या आत्याकडे आहे. इथे त्याचे मित्रही आहेत. मी पण खूप भावुक झालो आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सूरज कुठेही डगमगला नाही. त्याच्या आत्या आणि बहिणींची त्याला साथ आहेच. पण, आज संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतोय. त्याच्या आईवडिलांचा फोटो पाहिल्यानंतर मला भरुन आलंय", असं पुरषोत्तम दादा पाटील म्हणत आहेत. 


'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. १०० दिवसांचा हा खेळ यंदा ७० दिवसांतच संपणार आहे. त्यामुळे चाहतेही थोडे नाराज आहेत. पण, आता या सीझनची ट्रॉफी कोण उचलणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. सूरज चव्हाणने ट्रॉफी जिंकावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. 

Web Title: bigg boss marathi 5 purshottam dada patil shared suraj chavan mother father photo watch video