निक्की तांबोळीने 'कोकण हार्टेड गर्ल'लाही रडवलं, अंकिताच्या डोळ्यात पाणी पाहून चाहते भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 13:56 IST2024-07-31T13:56:13+5:302024-07-31T13:56:54+5:30
अंकिता प्रभू-वालावलकरला निक्की तांबोळीने नाकीनऊ आणले आहेत. त्यामुळे अंकिता ढसाढसा रडताना दिसली (bigg boss marathi 5)

निक्की तांबोळीने 'कोकण हार्टेड गर्ल'लाही रडवलं, अंकिताच्या डोळ्यात पाणी पाहून चाहते भडकले
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये सोशल मीडियावर लोकप्रिय असणारे प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार सहभागी आहेत. यातील प्रमुख चर्चा आहे ती म्हणजे कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर. याशिवाय घरात आणखी एक व्यक्ती सध्या सर्वांच्या चर्चेचं कारण बनलीय. ती म्हणजे निक्की तांबोळी. निक्कीने अंकिताला चांगलंच नाकीनऊ आणलं असून त्यामुळे अंकिता ढसाढसा रडताना दिसली.
निक्कीने अंकिताला रडवलं कारण...
बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की निक्की तांबोळी आणि अंकिता एका टास्कमध्ये असतात. नॉमिनेशनची तोफ असं या टास्कचं नाव असतं. अंकिता निक्कीला म्हणते,"मला तुझ्यासोबत पाडापाडीचं काही खेळायचं नाही. तू माझ्यापासून लांब राहा". त्यावर निक्की तिला म्हणते,"तू दूर जा...माझी मर्जी..तुला मला उचलून घ्यायचंच नाही आहे". पुढे अंकिला तिला उचलून घेत म्हणते,"तुला आता मी असं उचलून घेऊ का?". अंकिताने उचलून घेतल्याने निक्कीला राग येतो आणि ती म्हणते,"माझे हात पाहायचे आहेत का तुला कसे चालतात... परत हात लावलास तर तुझं तोंड मी खलबत्त्याने ठेचेल". त्यानंतर अंकिता सर्व सदस्यांपासून दूर जाते आणि ढसाढसा रडते.
अंकिताला रडताना पाहून चाहते भडकले
हा प्रोमो व्हायरल होताच अंकिताला रडताना पाहून चाहते भडकलेले दिसतात. अंकिता रडतेस कशाला, वाजव निकिताच्या एक सणसणीत, निक्की डोक्यात जातेय, अंकिता ताई निक्कीला आता मालवणी इंगा दाखवचं, अंकिता ताई आता रडायचं नाही लढायचं, निक्की ताई नका हो एवढं असा कमेंट करत लोकांनी निक्कीवर राग व्यक्त करुन अंकिताला सपोर्ट केलाय. आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात अंकिता रडत बसणार की सदस्यांना कोकणी हिसका दाखवणार हे पाहावे लागेल.