'वैभव जळतो आपल्यावर, तो फक्त बॉडीमुळे दिसतोय'; निक्की तांबोळीचं मोठं विधान, अरबाजची मूक संमती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:00 IST2024-09-04T11:59:39+5:302024-09-04T12:00:26+5:30

बिग बॉस मराठीच्या घरात निक्कीने अरबाजशी बोलताना वैभवबद्दल मोठं विधान केलंय (bigg boss marathi 5)

bigg boss marathi 5 nikki tamboli and arbaz patel comment on vaibhav chavan | 'वैभव जळतो आपल्यावर, तो फक्त बॉडीमुळे दिसतोय'; निक्की तांबोळीचं मोठं विधान, अरबाजची मूक संमती?

'वैभव जळतो आपल्यावर, तो फक्त बॉडीमुळे दिसतोय'; निक्की तांबोळीचं मोठं विधान, अरबाजची मूक संमती?

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये प्रत्येक दिवशी नात्यांची समीकरणं बदलताना दिसत आहेत. पहिल्या तीन आठवड्यात जान्हवी, निक्की, अरबाज आणि वैभव या चौघांची घट्ट मैत्री बघायला मिळाली. परंतु गेल्या आठवड्यापासून या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळतेय. निक्की आणि अरबाज पुन्हा एकमेकांशी बोलायला लागले आहेत. तर जान्हवी-वैभव यांच्यात आणखी मैत्री तयार होताना दिसतेय. बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोत निक्की अरबाजला वैभवबद्दल बोलताना दिसतेय. 

निक्की अरबाजला वैभवबद्दल काय म्हणाली?

निक्की अरबाजसोबत गार्डन एरियात बसली होती. निक्की अरबाजला म्हणते, "त्याला राग नाही माझा, त्याला jealousy आहे आपल्या दोघांबद्दल." अरबाज तिला विचारतो, "तो का जळेल आपल्यावर?" पुढे निक्की म्हणते, "बऱ्याच गोष्टी आहेत रे. जळतो म्हणजे तुझं गेममध्ये त्याच्यापेक्षा जास्त डोकं चालतं. तू दिसतोय. तुला जेव्हा राग येतो तेव्हा तो उभारुन दिसतो. विकेंडवर पण वैभवलाच रितेशभाऊंकडून ओरडा मिळात आहे की, तो अरबाज-अरबाज करतो. अरबाजची निगेटिव्ह चर्चा होतेय. पण चर्चा तरी होतेय. वैभववरचा अरबाजचा टॅग हटत नाही. त्याला एक इनसिक्यूरिटी आहे. वैभव फक्त त्याच्या बॉडीमुळे इथे दिसत आहे."" असं म्हणत निक्कीने वैभवबद्दल अरबाजला सांगितलं. अरबाजने निक्कीचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं.


वैभव निक्कीच्या विरोधात

वैभव चव्हाण गेल्या आठवड्यापासून निक्कीच्या विरोधात गेलाय. निक्की जेव्हापासून त्यांच्या ग्रुपच्या विरोधात जाऊन खेळायला लागलीय, तेव्हापासून निक्कीच्या विरोधात वैभव-जान्हवी गेले आहेत. नॉमिनेशन कार्याच्या वेळीही वैभव बोलत असताना निक्की मध्ये मध्ये बोलत असल्याने वैभव तिच्यावर चांगलाच चिडलेला दिसला. इतकंच नव्हे तर दोघांमध्ये घरात गेल्या काही दिवसांपासून छोटे मोठे वाद होत आहेत.

Web Title: bigg boss marathi 5 nikki tamboli and arbaz patel comment on vaibhav chavan