'बिग बॉस मराठी'चं घर भूताने पछाडलं! मानकाप्याच्या भीतीने सदस्यांची उडाली घाबरगुंडी, धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 08:48 IST2024-08-26T08:47:50+5:302024-08-26T08:48:17+5:30

Bigg Boss Marathi Season 5 :बिग बॉस मराठीच्या घरावर मोठं संकट आलं आहे. घरावर आलेल्या या संकंटातून सदस्य कसा मार्ग काढणार हे पाहावं लागेल.

bigg boss marathi 5 ghost entry house contestant gets scared horrorifying videoeo | 'बिग बॉस मराठी'चं घर भूताने पछाडलं! मानकाप्याच्या भीतीने सदस्यांची उडाली घाबरगुंडी, धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

'बिग बॉस मराठी'चं घर भूताने पछाडलं! मानकाप्याच्या भीतीने सदस्यांची उडाली घाबरगुंडी, धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचा पाचवा आठवडा सुरू झाला आहे. आणि या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरातील सदस्यांना मोठा धक्का बसणार आहे. बिग बॉसचं मराठीचं घर भूताने पछाडलं आहे. बिग बॉसच्या घरात मानकाप्याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे घरातील सदस्यांचा थरकाप उडाला आहे. बिग बॉसच्या घरातील धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओत बिग बॉस मराठीच्या घरावर मोठं संकट आल्याचं पाहायला मिळत आहे. मानकाप्याच्या भीतीने घरातील सदस्य इकडे तिकडे पळताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये घरातील सदस्यांच्या ओरडण्याचाही स्पष्ट आवाज ऐकू येत आहे. "एकटं फिरू नका नाहीतर मान कापणार" असं बाथरुमच्या आरशावरही लिहिलेलं पाहायला मिळत आहे. मानकाप्याच्या भीतीने घरातील सदस्यांची घाबरगुंडी उडाली आहे. आता घरावर आलेल्या या संकंटातून सदस्य कसा मार्ग काढणार हे पाहावं लागेल. 


दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात आता हळूहळू सदस्यांमधील समीकरणं बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले यांच्यानंतर इरिना रुडाकोवाचा घरातील प्रवास संपला आहे. तर निक्कीसमोर टीम A मधील सदस्यांची पोलखोल झाल्यामुळे त्यांच्यातील समीकरणही बदल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा खेळ आणखी रंजक होणार आहे. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण
 

Web Title: bigg boss marathi 5 ghost entry house contestant gets scared horrorifying videoeo