"त्याने माझ्या आई-वडिलांसमोर गोष्टी क्लिअर केल्या", अरबाजसोबतच्या नात्यावर निक्कीचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:45 IST2024-10-16T16:41:38+5:302024-10-16T16:45:20+5:30
'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये निक्की आणि अरबाज पटेलमध्ये पहिल्या दिवशीच चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

"त्याने माझ्या आई-वडिलांसमोर गोष्टी क्लिअर केल्या", अरबाजसोबतच्या नात्यावर निक्कीचं स्पष्टीकरण
Nikki Tamboli Reaction : 'बिग बॉस' मराठीच्या पाचवं पर्व चांगलच गाजलं. दरम्यान, या पर्वातील स्पर्धक अरबाज आणि निक्की या जोडीनं कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये निक्की आणि अरबाज पटेलमध्ये पहिल्या दिवशीच चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर त्यांच्यातील जवळीकही वाढली होती. अरबाज घरातून बाहेर गेल्यानंतरही निक्की ढसाढसा रडली होती. या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावरही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगल्या. यावर निक्की तांबोळीने भाष्य केलं आहे.
नुकतीच निक्की तांबोळीने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अरबाज पटेल सोबतच्या नात्यावर भाष्य केलं. या मुलाखतीत म्हणाली, "माझ्या आईने अरबाजच्या आईची एक मुलाखत पाहिली होती. सहाजिकच आहे कोणाचीही आई असो ती आपल्या मुलासाठी खूप प्रोटेक्टिव्ह असते. 'बिग बॉस'च्या घरामध्ये असताना मी एक वाक्य म्हणाले होते, जेव्हा मी सगळ्यासोबत एकत्र बसले होते. तेव्हा तो माझाच आहे असं मी म्हणाले होते. ते माझ्या आईने पाहिलं होतं, त्यामुळे फॅमिली विकमध्ये 'बिग बॉस'च्या घरी माझी आई आल्यानंतर तेव्हा ती म्हणाली, अगं! असं काही बोलू नको, कारण बाहेर त्याच्याबद्दल लग्नझाल्याच्या चर्चा होत आहेत".
पुढे निक्की म्हणाली, "पण जेव्हा हा एपिसोड टेलिकास्ट झाला अरबाजने तो पाहिला. त्यानंतर त्याने माझ्या आई-वडिलांसोबत आणि मॅनेजमेंटसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण काही कारणांमुळे त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर अरबाजने माझ्या आई-वडिलांसमोर सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. की माझं लग्न वगैरे झालेलं नाही, असं त्याने सांगितलं".
"प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. मुलांच्या आयुष्यातही काही मुली येऊन जातात. तेव्हा तो मला म्हणाला की तुझ्यासाठी मी सगळं सोडलं आहे. तर ते काय होतं काय नाही या सर्व गोष्टींची मी बाहेर आल्यावर या गोष्टींवर आमची चर्चा झाली. शिवाय मला कळतं की कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा कोणत्या नाही. मी एक समजुतदार मुलगी आहे. त्यामुळे प्रत्येकाने भूतकाळाला मागे सारून भविष्याकडे पाहायचं असतं. असं तर मी म्हणणार नाही की मी त्याला माफ केलंय. मी कोणीही नाही त्याला माफ करणारी. प्रत्येकाचं आयुष्य असतं त्यांची काही तत्व असतात. त्याला माहिती आहे की त्याने काय केलंय. मलाही माहितीये की मी कुठे खुश राहू शकते आणि मला भविष्यात काय करायचं आहे. पण, आमच्यामध्ये जे काही नातं आहे त्यामध्ये आम्ही खुश आहोत". असा खुलासा निक्की तांबोळीने या मुलाखतीत केला.