मैं चली बनके हवा...; 'बिग बॉस मराठी' फेम जान्हवीचा 'किल्लर' अंदाज, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:48 IST2024-10-16T16:47:49+5:302024-10-16T16:48:46+5:30

"जरासा झुम लू में" या गाण्यावर जान्हवीने डान्स केला आहे. या व्हिडिओत तिच्या कातिल अदा पाहायला मिळत आहेत.

bigg boss marathi 5 fame janhavi killekar dance video goes viral | मैं चली बनके हवा...; 'बिग बॉस मराठी' फेम जान्हवीचा 'किल्लर' अंदाज, व्हिडिओ व्हायरल

मैं चली बनके हवा...; 'बिग बॉस मराठी' फेम जान्हवीचा 'किल्लर' अंदाज, व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी ५ ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यंदाच्या पर्वात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सहभागी झाली होती. निक्की तांबोळीबरोबरच जान्हवीनेही सुरुवातीला बिग बॉसचं घर डोक्यावर घेतलं होतं. वर्षा उसगावकर आणि पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्याने जान्हवीला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. पण, नंतर  जान्हवीने तिची चूक सुधारली होती. 

बिग बॉसच्या घरात खेळाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही जान्हवी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जान्हवीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. पोस्टमधून ती चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स देत असते.  नुकतंच जान्हवीने एक रील व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत जान्हवी साडीमध्ये डान्स करताना दिसत आहे. 


गुलाबी साडी आणि काळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घालत जान्हवीने डान्स केला आहे. "जरासा झुम लू में" या गाण्यावर जान्हवीने डान्स केला आहे. या व्हिडिओत तिच्या कातिल अदा पाहायला मिळत आहेत. जान्हवीचा हा डान्स पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

दरम्यान, जान्हवी बिग बॉस मराठीच्या टॉप ६ सदस्यांपैकी एक होती. बिग बॉस मराठीच्या फायनलला पैशांची बॅग उचलत जान्हवीने सहाव्या स्थानावर समाधान मानणं पसंत केलं. जान्हवीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने भाग्य दिले तू मला या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. 

Web Title: bigg boss marathi 5 fame janhavi killekar dance video goes viral