धनंजय पोवारच्या घरी परदेशी गर्ल इरिनाचं जंगी स्वागत, अभिनेत्री म्हणाली- "महालक्ष्मी मातेच्या नावानं चांगभलं!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 12:07 IST2024-10-25T12:05:40+5:302024-10-25T12:07:57+5:30

बिग बॉस मराठी फेम इरिना रुडाकोव्हा कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पोवारच्या घरी गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे

bigg boss marathi 5 fame Irina rudacova received a warm welcome at Dhananjay Powar kolhapur house | धनंजय पोवारच्या घरी परदेशी गर्ल इरिनाचं जंगी स्वागत, अभिनेत्री म्हणाली- "महालक्ष्मी मातेच्या नावानं चांगभलं!"

धनंजय पोवारच्या घरी परदेशी गर्ल इरिनाचं जंगी स्वागत, अभिनेत्री म्हणाली- "महालक्ष्मी मातेच्या नावानं चांगभलं!"

बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक परदेसी गर्ल अशी ओळख असलेली इरिना रुडाकोव्हा बिग बॉसनंतरही चांगलीच चर्चेत आहे. इरिना सध्या वैभव चव्हाणसोबत बिग बॉसच्या घरातील तिच्या मित्रांना भेटत आहे. काहीच दिवसांपूर्वी इरिनाने वैभव चव्हाणसोबत बारामतीला बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाणच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. आता इरिनाने धनंजय पोवारच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. त्यावेळी धनंजयची आई आणि पत्नीने तिचं मराठमोळ्या थाटात स्वागत केलं.

इरिनाचंं धनंजयच्या घरी खास स्वागत

धनंजय पोवारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत इरिना रुडाकोव्हा धनंजय पोवारच्या घरी आलेली दिसतेय. त्यावेळी धनंजयची आई आणि पत्नीने औक्षण करुन इरिनाचं स्वागत केलं. याशिवा इरिना घरी आल्यावर तिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. पुढे इरिना आणि धनंजय बेडरुममध्ये बसले होते. त्यावेळी धनंजयने इरिनाला कोल्हापुरी थाटात खास मराठी शिकवलं. शेवटी महालक्ष्मी मातेच्या नावाने चांगभलं असं इरिना म्हणताना दिसते.


इरिनाची बिग बॉस मराठीनंतर चर्चा

इरिना रुडाकोव्हा बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून लवकर बाहेर पडली असली तरीही तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. इरिनाला बिग बॉस मराठीनंतर लगेचच 'इंद्रायणी' मालिकेत काम करण्याची ऑफर आली. इरिना सध्या 'इंद्रायणी' मालिकेत भूमिका साकारतेय. याशिवाय बिग बॉस मराठीनंतर पुण्याच्या कसबा गणपती मंडपात इरिनाने पारंपरिक नृत्य करुन ठेका धरला. बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर इरिना आणि वैभव चव्हाणची विशेष मैत्री चर्चेचा विषय ठरली

 

 

Web Title: bigg boss marathi 5 fame Irina rudacova received a warm welcome at Dhananjay Powar kolhapur house