"Indian Idol' जिंकल्यानंतर माझ्याबद्दल अफवा पसरवल्या..." अभिजीत सावंतचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 16:57 IST2024-09-02T16:55:10+5:302024-09-02T16:57:55+5:30

'इंडियन आयडॉल' या शोमुळे अभिजीत सावंत जगभरात प्रसिद्ध झाला.

bigg boss marathi 5 fame abhijeet sawant revealed in interview says rumors were spread about me after winning indian idol | "Indian Idol' जिंकल्यानंतर माझ्याबद्दल अफवा पसरवल्या..." अभिजीत सावंतचा धक्कादायक खुलासा

"Indian Idol' जिंकल्यानंतर माझ्याबद्दल अफवा पसरवल्या..." अभिजीत सावंतचा धक्कादायक खुलासा

Abhijeet Sawant Reaction : 'इंडियन आयडॉल' या शोमुळे अभिजीत सावंत जगभरात प्रसिद्ध झाला. आपल्या सुमधुर गायनाने त्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. सध्या अभिजीत 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्ये पाहायला मिळतोय. या शोमुळे सगळीकडेच त्याची चर्चा होत आहे.  प्रेक्षकांपासून ते होस्ट रितेश देशमुखने सुद्धा त्याचं तोंडभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. अभिजीत सावंत 'बिग बॉस'च्या घरात शांतीत क्रांती करताना दिसतो आहे. अनेकजण अभिजीत या सीझनच्या ट्रॉफिवर आपलं नाव कोरेल असं भाकित वर्तवत आहेत. शिवाय 'बिग बॉस'च्या घरातील त्याची खेळी प्रेक्षकांना प्रचंड आवडते आहे.


अलिकडेच 'बिग बॉस मराठी'चं घर गाजवणाऱ्या अभिजीत सावंतने 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्याने त्याने दिलेल्या मुलाखतीत 'इंडियन आयडॉल'च्या प्रवासावर भाष्य केलं आहे. 

काय म्हणाला अभिजीत सावंत?

नुकतीच अभिजीतने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "माझ्याबद्दल 'इंडियन आयडॉल' जिंकल्यानंतर अफवा पसरवण्यात आल्या. माझ्याबद्दल आणखी एक अफवा होती की, 'इंडियन आयडॉल' हा पूर्ण शो खोटा असल्याचं सांगण्यात आलं. एका मॅगझीनने आर्टिकल छापलं आणि हा कार्यक्रम खोटा आहे, असं लिहलं". असा धक्कादायक खुलासा त्याने या मुलाखतीत केला.

अभिजीत सावंत हा 'इंडियन आयडॉल' च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता. 'मर जावॉं मिट जावॉं', 'पुंगी', 'याद तेरी' अशी गाण्यांना त्याने आपला आवाज दिला आहे. शिवाय अभिजीतने  'इंडियन आयडल'च्या फिनालेमध्ये 'मोहब्बते लुटाउंगा' हे गायलेलं गाणं आजही चाहत्यांच्या आवडीचं आहे. 

Web Title: bigg boss marathi 5 fame abhijeet sawant revealed in interview says rumors were spread about me after winning indian idol