'काहीतरी स्टॅंडर्ड ठेवा...' रिल स्टार सुरज चव्हाणची बिग बॉसच्या घरातील एन्ट्री पाहून नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 15:52 IST2024-07-29T15:47:34+5:302024-07-29T15:52:33+5:30

यंदाच्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं.

bigg boss marathi 5 contestant suraj chavan being trolled by netizens while enter in the house | 'काहीतरी स्टॅंडर्ड ठेवा...' रिल स्टार सुरज चव्हाणची बिग बॉसच्या घरातील एन्ट्री पाहून नेटकरी संतापले

'काहीतरी स्टॅंडर्ड ठेवा...' रिल स्टार सुरज चव्हाणची बिग बॉसच्या घरातील एन्ट्री पाहून नेटकरी संतापले

Bigg Boss Marathi 5 : यंदाच्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून होतं. मराठी मनोरंजनाचा बॉस असलेल्या या शोच्या नव्या पर्वाची दणक्यात सुरूवात झाली. आपला लय भारी अभिनेता रितेश देशमुख यंदाचा सीझन होस्ट करणार आहे. एकुणच या पर्वामध्ये मालिका तसेच सिनेसृष्टीतील कलाकारांसह गायन, रिल स्टार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांसारखी मंडळी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसेच रिल स्टार यांना बिग बॉसच्या घरात पाहून अनेकांनी ट्रोलही केलं आहे.


बिग बॉसच्या घरात सुरज चव्हाणची एन्ट्री-

यंदाच्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये रिल स्टार सुरज चव्हाणची एन्ट्री झाल्याची पाहायला मिळते आहे. गुलीगत धोका म्हणत आपल्या विनोदी शैलीने त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अशातच बिग बॉसच्या घरामध्ये त्याची झालेली एन्ट्री काही नेटकऱ्यांना आवडलेली दिसत नाही. टिकटॉक त्यानंतर इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून सुरज चव्हाणला प्रसिद्धी मिळाली. 

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये रिल स्टार सुरज चव्हाणने एन्ट्री घेतल्यानंतर कलर्स मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवरून त्याच्यासाठी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर "काहितरी स्टॅंडर्ड ठेवा, कोणालाही उचलून आणता" अशी कमेंट करत सोशल मीडिया यूजर्सनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक-

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 

Web Title: bigg boss marathi 5 contestant suraj chavan being trolled by netizens while enter in the house