बिग बॉस मराठीच्या घरात कोणाला डोकं नाही? अरबाज पटेलने घेतलं 'या' स्पर्धकाचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 15:54 IST2024-09-23T15:53:50+5:302024-09-23T15:54:46+5:30

अरबाज पटेलने बिग बॉसमधून बाहेर आल्यावर या स्पर्धकाला डोकं नाही असं सांगितलं आहे (bigg boss marathi 5, arbaz patel)

Bigg Boss Marathi 5 contestant Arbaz Patel took name pandharinath paddy kaamble suraj chavan | बिग बॉस मराठीच्या घरात कोणाला डोकं नाही? अरबाज पटेलने घेतलं 'या' स्पर्धकाचं नाव

बिग बॉस मराठीच्या घरात कोणाला डोकं नाही? अरबाज पटेलने घेतलं 'या' स्पर्धकाचं नाव

अरबाज पटेल हा काल बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून बाहेर पडला. या आठवड्यात अरबाजचं बाहेर जाणं सर्वांसाठी धक्कादायक होतं. काल एलिमिनेशनच्या लास्ट राऊंडला अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये होते. त्यापैकी अरबाज बाहेर पडणार असल्याची घोषणा बिग बॉसने केली. त्यामुळे निक्कीला अश्रू अनावर झाले. घराबाहेर आल्यानंतर अरबाजने एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत घरातील कोणाला डोकं नव्हतं, याचा खुलासा केलाय.

अरबाजने घेतलं डोकं नसलेल्या स्पर्धकाचं नाव

अरबाज पटेलने घराबाहेर आल्यावर एका मुलाखतीत घरातील डोकं नसलेल्या स्पर्धकाचं नाव घेतलंय. अरबाज म्हणतो, "पॅडी दादा नाही लावत डोकं. पॅडीदादा गेममध्ये आहेत म्हणून खेळतात. पण पॅडीदादाने जर डोकं लावलं तर ते पुढे जाऊन खूप चांगलं खेळू शकतात. पॅडीदादा सूरजमध्ये अडकले आहेत. सूरज आणि पॅडीदादा यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. पण डोकं लावलं त्यांनी तर काहीतरी गोष्टी दिसू शकतील."


अरबाज पुढे म्हणाला, "पॅडीदादाला चक्रview रूममध्ये पण बोलावलेलं पण पॅडीदादा एकदम नॉर्मलच प्रतिक्रिया देत होते. त्यामुळे ते डोकं लावत नाहीत. चक्रview रुमचा कसा वापर करुन घ्यायचा त्यांना समजलं नाही. त्यांनी दाखवलं नाही. त्यामुळे मला वाटतं की पॅडीदादाकडे थोडं गेमसाठी डोकं पाहिजे." अशाप्रकारे अरबाजने त्याचं स्पष्टपणे मत मांडलं. आठ आठवड्यांचा खेळ खेळून अरबाजला कमी मतं मिळाल्याने बिग बॉसमधून बाहेर यावं लागलं आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 5 contestant Arbaz Patel took name pandharinath paddy kaamble suraj chavan