Bigg Boss Marathi 4 : 'विष-अमृत' नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील कोणते सदस्य होतील नॉमिनेट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 14:23 IST2022-10-31T14:20:59+5:302022-10-31T14:23:43+5:30
‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या चांगलंच गाजतंय. पहिल्या दिवशीपासूनव या शोमध्ये राडे सुरू झालेत आणि ते थांबायची चिन्ह नाहीत.

Bigg Boss Marathi 4 : 'विष-अमृत' नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील कोणते सदस्य होतील नॉमिनेट?
‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या चांगलंच गाजतंय. पहिल्या दिवशीपासूनव या शोमध्ये राडे सुरू झालेत आणि ते थांबायची चिन्ह नाहीत. उलट दिवसेंदिवस त्यात वाढ होणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामधून काल योगेश जाधवला बाहेर पडावे लागले. तर घरातील सदस्यांना मिळाले सरप्राईझ.
घरामध्ये झाली सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणजेच स्नेहलता वसईकर. स्रेहलताला अनेक ऐतिहासिक भूमिकांमध्ये तुम्ही बघितलं असेलच. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने सोयरा बाईसाहेब ही भूमिका साकारली होती. आता तिच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलणार ? नॉमिनेशन कार्यात त्याचा काय परिणाम होणार.
नुकत्याच समोर आलेल्या प्रमोमध्ये बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपावले आले आहे विष - अमृत हे नॉमिनेशन कार्य. बिग बॉस यांनी जाहीर केले, "जो सदस्य पेटारा उघडुन त्यातील विष मिळवेल तो ठरवेल विरोधी टीममधील कोणता सदस्य नॉमिनेट होईल". बघुया यात कोणती टीम बाजी मारणार ? आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार. बघूया पुढे काय होईल ते आजच्या भागात.