Bigg Boss Marathi 4 : अपूर्वा विकास सावंतमुळे वैतागली...; तू गेमर आहेस एक नंबरचा... म्हणत ढसाढसा रडली...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:50 PM2022-11-23T13:50:56+5:302022-11-23T13:51:41+5:30

Bigg Boss Marathi 4 : किरण माने सीक्रेट रूममध्ये गेलेत आणि ते जाताच विकास सावंत (Vikas Sawant  )आणि अपूर्वा नेमळेकरच्या (Apurva Nemlekar) मैत्रीला नवा बहर आला. पण आता याच विकास सावंतमुळे अपूर्वा ढसाढसा रडली...

Bigg Boss Marathi 4 updates Apurva Nemlekar Cry Because Of Vikas Sawant | Bigg Boss Marathi 4 : अपूर्वा विकास सावंतमुळे वैतागली...; तू गेमर आहेस एक नंबरचा... म्हणत ढसाढसा रडली...!!

Bigg Boss Marathi 4 : अपूर्वा विकास सावंतमुळे वैतागली...; तू गेमर आहेस एक नंबरचा... म्हणत ढसाढसा रडली...!!

googlenewsNext

बिग बॉस मराठी’चं चौथ पर्व (Bigg Boss Marathi 4) सध्या वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. शो जसजसा पुढे सरकतोय, तशतशी रंगत वाढत चाललीय. घरात रोज नवे टास्क रंगत आहेत आणि प्रत्येक सदस्य जीव तोडून टास्क खेळतोय. याशिवाय रोजचे राडे, भांडण, प्रेम असं सगळं आहेच. तूर्तास अपडेट आहे ती अपूर्वाबद्दलची. होय, किरण माने सीक्रेट रूममध्ये गेलेत आणि ते जाताच विकास सावंत (Vikas Sawant  )आणि अपूर्वा नेमळेकरच्या (Apurva Nemlekar) मैत्रीला नवा बहर आला. पण आता याच विकास सावंतमुळे अपूर्वा ढसाढसा रडली.

‘बिग बॉस’ने विकास व अपूर्वाला एक टास्क देत दोघांना एकाच बेल्टने बांधलं. त्यामुळे दोघांनाही घरात एकत्र फिरावं लागतंय. याचदरम्यान असं काही घडलं की अपूर्वा रडरड रडली. 

मेकअपवरून हे सगळं भांडण सुरू झालं. ‘तू माझ्या बेडवर बसून मेकअप करू शकत नाही का?,’ असं विकास सावंत म्हणतो. यावर,‘माझं मेकअपचं सामना सगळं इथे आहे. हे सामान घेऊन तिथे जा तिथून इथे या,’ असं अपूर्वा म्हणते. तिचा नकार ऐकून, ‘एवढं करू शकत नाही का?’ असं विकास म्हणतो आणि अपूर्वा जाम भडकते.

‘प्रत्येकजण इथे आरशाजवळच मेकअप करतो. तिथे जाऊन काय होणार आहे? तुझ्या बेडजवळ जाऊन मेकअप करायचा आहे तर चल. तुला सिद्ध काय करायचं आहे? मी तुला त्रास देत आहे असं तुला सिद्ध करायचं आहे का? मी तुझ्याबरोबर तसं वागतही नाही. मुद्दाम मला दुखावू नकोस. तू जे करत आहेस ते अत्यंत चुकीचं आहे. मगाशी मला म्हणाला मी नाही उठणार. माझे पाय दुखत आहेत. मी फळं खायला येणार नाही. तो नाही बोलल्यानंतर मी फळं नाही खाल्ली. ते कोणी इथे बघत नाही. मी छळते असे उगाच माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. तू मोठा गेमर आहेस....,’असं अपूर्वा म्हणते आणि हे बोलत असतानाच तिला रडू कोसळतं. यानंतर काय घडतं, ते आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. विकास व अपूर्वाची मैत्री यामुळे तुटते की येणाऱ्या दिवसांत आणखी बहरते, ते लवकरच कळेल.

Web Title: Bigg Boss Marathi 4 updates Apurva Nemlekar Cry Because Of Vikas Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.