Bigg Boss Marathi 4 : घरात रंगणार सिनियर्स VS जुनिअर्स हे साप्ताहिक कार्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 15:29 IST2022-11-08T15:28:42+5:302022-11-08T15:29:17+5:30
आज बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये रंगणार आहे सिनियर्स VS जुनिअर्स हे साप्ताहिक हे कार्य ! ज्यामध्ये सिनिअर्सना जुनिअर्स टीमचा सिनेमाला जाण्याचा प्लॅन उधळून लावायचा आहे.

Bigg Boss Marathi 4 : घरात रंगणार सिनियर्स VS जुनिअर्स हे साप्ताहिक कार्य !
नवा आठवडा, नवी आव्हानं आणि नवा जोश... सदस्य सज्ज आहेत नव्या टास्कसाठी... कालच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. याचमुळे घरातील समीकरण जरा बदलेली दिसत आहे. आज बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)च्या घरामध्ये रंगणार आहे सिनियर्स VS जुनिअर्स हे साप्ताहिक हे कार्य ! ज्यामध्ये सिनिअर्सना जुनिअर्स टीमचा सिनेमाला जाण्याचा प्लॅन उधळून लावायचा आहे. यात कोणती टीम बाजी मारणार हे आजच्या भागात कळेल.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरु आहे जोरदार चर्चा... आता ही चर्चा की तक्रार आजच्या भागामध्ये कळेलच... पण त्यांच्या संभाषणावरून तर या तक्रार करत आहेत असेच दिसून येत आहे. एकीकडे तेजस्विनी आणि अमृता धोंगडे तर दुसरीकडे समृद्धी आणि स्नेहलता. तेजस्विनीचे म्हणणे आहे, रुचिरा दोन्हीकडे खेळते तू बघ. ती दोन्ही कडून खेळते... तिला तिथे पण खुश करायचे आहे, तिला इथे पण खुश करायचे आहे. मला पटत आहे तू काय म्हणतेस पण तूच सांग अमृता देशमुखचा निकष... अमृता देशमुख पण दोन्ही कडून खेळते. एकतर ती बोलायला लागली की थांबत नाही.
अमृताचे म्हणणे आहे, ती, देशमुख संपतच नाही बोलणं काही केल्या. दुसरीकडे समृद्धी स्नेहलताशी बोलताना दिसणार आहे, आता जर मला माझ्या परफॉर्मन्स नंतर जेव्हा माझं नावं घेतलं जात स्ट्रॉंग परफॉर्मर वैगरे आणि मग जर कोणी मला माझ्या परफॉर्मन्सवरून बोलना तर मग मी लेफ्ट राईट सेंटर बोलू शकते. पण ज तुम्हांला स्वतःला पण माहिती आहे, तुम्ही स्विकारता देखील मी टिकू शकले असते, पण मी उठले लवकर मग नंतर जे वाद होतात ना कसे का? तिथे चुकता तुम्ही... आता स्नेहलता आणि समृद्धी कोणाविषयी बोलत आहेत हे आजच्या भागामध्ये कळलेच.