Bigg Boss Marathi 4 Grand Finale : सातारच्या बच्चनचा धम्माल डान्स; किरण मानेंचा 'मै हू डॉन' डान्स पाहून तुम्हीही थिरकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 08:28 PM2023-01-08T20:28:32+5:302023-01-08T20:29:22+5:30

बिग बॉस ग्रॅंड फिनालेमध्ये स्पर्धकांच्या डान्स परफॉर्मन्सने धम्माल आणली आहे.

bigg-boss-marathi-4-grand-finale-kiran-mane-performs-on-mai-hoon-don-song | Bigg Boss Marathi 4 Grand Finale : सातारच्या बच्चनचा धम्माल डान्स; किरण मानेंचा 'मै हू डॉन' डान्स पाहून तुम्हीही थिरकाल

Bigg Boss Marathi 4 Grand Finale : सातारच्या बच्चनचा धम्माल डान्स; किरण मानेंचा 'मै हू डॉन' डान्स पाहून तुम्हीही थिरकाल

googlenewsNext

Bigg Boss Marathi 4 Grand Finale : सातारचा बच्चन अशी ओळख असलेला किरण माने (Kiran Mane) याने मेहनतीच्या जोरावर फिनाले मध्ये प्रवेश केला आहे. इतकंच नाही तर तो विजेता होण्याचा प्रबळ दावेदारही मानला जातोय. किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात चुरशीची लढत आहे मात्र सातारचा किरण मानेच बाजी मारेल अशी पोस्ट 'बिग बॉस खबरी' या इन्स्टापेजने शेअर केली आहे. यामध्ये किरण माने पहिल्या क्रमांकावर, अपुर्वा नेमळेकर दुसऱ्या क्रमांकावर आणि राखी सावंत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं दिसत आहे. तर अमृता धोंगडे चौथ्या आणि अक्षय केळकर पाचव्या स्थानी आहे. 

सध्या बिग बॉसमध्ये स्पर्धकांच्या डान्स परफॉर्मन्सने धम्माल आणली आहे. सातारच्या बच्चनने तर 'मै हू डॉन' या गाण्यावर परफॉर्म करत सर्वांचे मनोरंजन केले आहे. त्यांचा हा परफॉर्मन्स बघून तुम्हालाही थिरकण्याचा मोह आवरता येणार नाही. 

दावेदार सगळेच पण विनर एक

महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांचे सूत्रसंचालन आणि टॉप ५ स्पर्धकांची वाढलेली धाकधूक. बिग बॉस ४ चे पर्व आज अखेर संपत आहे.  संध्याकाळी ७ वाजता ग्रॅंड फिनालेला सुरुवात झाली आहे. दावेदार सगळेच पण विजेता किंवा विजेती एकच असणार आहे. बघूया या चौथ्या पर्वाची ट्रॉफी कोण घेऊन जातं ते.

Web Title: bigg-boss-marathi-4-grand-finale-kiran-mane-performs-on-mai-hoon-don-song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.