Bigg Boss Marathi 4 Grand Finale : 'मी अशीच आहे अशीच राहणार', अपुर्वाच्या पोस्टवर प्रेक्षक म्हणतात, तू अशीच बाहेर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 06:04 PM2023-01-08T18:04:02+5:302023-01-08T18:04:38+5:30

स्पष्ट बोलणे आणि नेहमीच ठाम भूमिकेच्या जोरावर अपुर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या ग्रॅंड फिनालेमध्ये प्रवेश केला आहे.

bigg-boss-marathi-4-grand-finale-contestant-apurva-nemlekar-shared-post-netizens-trolled | Bigg Boss Marathi 4 Grand Finale : 'मी अशीच आहे अशीच राहणार', अपुर्वाच्या पोस्टवर प्रेक्षक म्हणतात, तू अशीच बाहेर...

Bigg Boss Marathi 4 Grand Finale : 'मी अशीच आहे अशीच राहणार', अपुर्वाच्या पोस्टवर प्रेक्षक म्हणतात, तू अशीच बाहेर...

googlenewsNext

Bigg Boss Marathi 4 Grand Finale : बिग बॉस मराठी ४ च्या ग्रॅंड फिनालेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. अवघ्या काही तासात बिग बॉस ४ चा विजेता किंवा विजेती जाहीर होणार आहे. त्याआधी स्पर्धकांचे धमाल डान्स परफॉर्मन्सही बघायला मिळणार आहेत. किरण माने, अपुर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे आणि अक्षय केळकर या टॉप ५ स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी लढत असणार आहे. दरम्यान शेवंता म्हणजेच अपुर्वा नेमळेकरचा (Apurva Nemlekar) जशी आहे तशीच आहे. अशी पोस्टच तिने शेअर केली आहे.

मी अशीच आहे अशीच राहणार 

स्पष्ट बोलणे आणि नेहमीच ठाम भूमिकेच्या जोरावर अपुर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या ग्रॅंड फिनालेमध्ये प्रवेश केला आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेतून शेवंता या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. अपुर्वाचा रोखठोक स्वभाव सर्वांनीच बिग बॉस मध्ये पाहिला. आज ग्रॅंड फिनाले आहे आणि तिने पोस्ट केलेला एक व्हिडिओ चर्चेत आहे. मी अशीच आहे आणि अशीच राहणार असं ती व्हिडिओत सांगते. 

अपुर्वाच्या या पोस्टवर काही प्रेक्षक मात्र तिला ट्रोल करत  आहेत. 'जशी आहे तशीच राहणार आणि अशीच बाहेर जाणार, मग तू घरी जाणार' अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तर काही जणांनी अपुर्वाच विनर असं म्हणत तिला पाठिंबा दिला आहे.

टॉप ५ सदस्य कोण? 

बिग बॉस मराठी 4’च्या या शेवटच्या आठवड्यात मिड वीक एव्हिक्शन झालं. त्यामध्ये वाईल्ड कार्ड म्हणून आलेला अभिनेता आरोह वेलणकर घरातून बाहेर पडला. तर याआधी रविवारी झालेल्या एलिमिनेशनमध्ये अभिनेता स्पर्धक प्रसाद जवादे घराबाहेर पडला होता. प्रसाद यंदाच्या सीजनचा एक स्ट्रॉंग स्पर्धक समजला जात होता, अनेकांनी त्याला फायनलमध्ये पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु तो बाहेर पडल्याने अनेकांना धक्का बसला होता. दरम्यान पाच स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले आहेत यामध्ये अपुर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), किरण माने (Kiran Mane), अक्षय केळकर(Akshay Kelkar), अमृता धोंगडे (Amruta Dhongde) आणि राखी सावंतचा (Rakhi Sawant) समावेश आहे.

दावेदार सगळेच पण विनर एक

महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांचे सूत्रसंचालन आणि टॉप ५ स्पर्धकांची वाढलेली धाकधूक. बिग बॉस ४ चे पर्व आज अखेर संपत आहे.  संध्याकाळी ७ वाजता ग्रॅंड फिनालेला सुरुवात होणार आहे. दावेदार सगळेच पण विजेता किंवा विजेती एकच असणार आहे. बघुया या चौथ्या पर्वाची ट्रॉफी कोण घेऊन जातं ते.
 

Web Title: bigg-boss-marathi-4-grand-finale-contestant-apurva-nemlekar-shared-post-netizens-trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.