Bigg Boss Marathi 4 :बिग बॉसच्या घरात तुफान राडा, अपूर्वा म्हणाली- ए किरण माने....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 12:45 IST2022-10-11T12:44:22+5:302022-10-11T12:45:11+5:30

बिग बिग बॉसची चौथा सीझन सुरू झाल्यापासून घरात प्रचंड वादावादी सुरु आहे.

Bigg Boss Marathi 4 : Argument in the Bigg Boss house between contestant | Bigg Boss Marathi 4 :बिग बॉसच्या घरात तुफान राडा, अपूर्वा म्हणाली- ए किरण माने....

Bigg Boss Marathi 4 :बिग बॉसच्या घरात तुफान राडा, अपूर्वा म्हणाली- ए किरण माने....

छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) २ ऑक्टोबर पासून कलर्स मराठी वाहिनीवर भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये प्रसाद जवादे, अमृता धोंडगे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशस्वी मसुरेकर यांच्यासह इतर कलाकार सहभागी झाले आहेत. आज या सदस्यांचा घरातील आठवा दिवस आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अपूर्वा आणि किरण मानेमध्ये वाद होताना दिसणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्यांमध्ये होणार तुफान राडा. किरण माने विकासला म्हणाले "अरे तू शेपूट आहेस, आहेस का?" आणि इथून घरात वादाची ठिणगी पडली. मेघा घाडगे म्हणाल्या, "हे शब्द बोलायची गरज आहे का ? जो बोलतो आहे त्याला बोलत नाही आहेस तू. किरण माने म्हणाले, "तो किती सहन करणार ? चार पाच दिवस सहन करतो आहे तो. त्यावर अपूर्वा भडकली, "ए किरण माने तो त्याचं बोलेल ना, तुला काय गरज आहे आणि भांडणं वाढतंच गेलं...आता हा वाद कुठवर गेला? पुढे काय झालं ? हे आजच्या भागामध्ये कळेल. 

बिग बिग बॉसची चौथा सीझन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्ये प्रचंड वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले होते. ऐकूणच घरात गेल्यापासून अपूर्वाचे रोज कोणाबरोबर तरी वाद होताना दिसतोय. 

Web Title: Bigg Boss Marathi 4 : Argument in the Bigg Boss house between contestant