Bigg boss marathi 3: 'मी खरंच खेळले नाही का?' मीराच्या प्रश्नामुळे विकास संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 18:14 IST2021-12-14T18:12:47+5:302021-12-14T18:14:44+5:30

Bigg boss marathi 3: या घरात आता शेवटचे ७ स्पर्धक राहिले असून प्रत्येकामध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

bigg boss marathi 3 vikas and meera conversation | Bigg boss marathi 3: 'मी खरंच खेळले नाही का?' मीराच्या प्रश्नामुळे विकास संभ्रमात

Bigg boss marathi 3: 'मी खरंच खेळले नाही का?' मीराच्या प्रश्नामुळे विकास संभ्रमात

छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi). सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून हा शो आता ग्रँड फिनालेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या घरात आता शेवटचे ७ स्पर्धक राहिले असून प्रत्येकामध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे असाच मतभेद आता मीरा आणि विकासमध्ये झाल्याचं दिसून येत आहे. यावरुन ते चर्चादेखील करणार आहेत.

अलिकडेच घरात रंगलेल्या टास्कवरुन मीरा आणि विकास चर्चा करणार आहेत. यात मी घरात कधीच खेळले नाही का? असा प्रश्न ती विचारणार आहे.

"मला एवढं सांग मी खरंच काही नाही खेळले का?", असा प्रश्न मीरा विकासला विचारणार आहे. त्यावर इ"थे असलेला प्रत्येक सदस्य विनर होऊ शकतो", असं म्हणत विकास तिची समजूत काढतो. परंतु, त्याच्या या वाक्यावर मीरा त्याला प्रतिप्रश्न करते. "तुझ्या लिस्टमध्ये तर मी नव्हतेच. इथे फक्त टास्कमधले निकष तुम्ही लावताय... मग मी पण उद्या सगळ्यांना सांगेन एक वर्ष तुम्ही रेसलिंग करा मग या इकडे...”

दरम्यान, आता मीरा आणि विकास यांच्यातील चर्चा कुठपर्यंत पोहोचणार आहे? त्यांच्यात पुन्हा नवा वाद रंगणार का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये मिळणार आहेत.

Web Title: bigg boss marathi 3 vikas and meera conversation