Bigg boss mararhi: 'बोलण्याची पद्धत असते'; विशाल- सोनालीमध्ये पुन्हा नव्या वादाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:30 IST2021-11-24T16:30:00+5:302021-11-24T16:30:03+5:30

Bigg boss mararhi: बिग बॉसच्या घरात सोनाली, विकास आणि विशाल एकमेकांशी छान गप्पा मारत असतात. याच गप्पांमध्ये त्यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळतं.

bigg boss marathi 3 sonali patil and vishal nikam new argument | Bigg boss mararhi: 'बोलण्याची पद्धत असते'; विशाल- सोनालीमध्ये पुन्हा नव्या वादाला सुरुवात

Bigg boss mararhi: 'बोलण्याची पद्धत असते'; विशाल- सोनालीमध्ये पुन्हा नव्या वादाला सुरुवात

 बिग बॉस मराठीच्या (Bigg boss mararhi)  घरातील लोकप्रिय पण तितकीच चर्चेत राहणारी जोडी म्हणजे विशाल (vishal nikam) आणि सोनाली (sonali patil) . हे दोघंही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. कधी यांच्यातील वाद असो वा रुसवे-फुगवे. या जोडीकडे प्रेक्षकांचं कायम लक्ष असतं. सध्या या दोघांमध्ये पुन्हा एकदा काही तरी बिनसल्याचं दिसून येत आहे. 

बिग बॉसच्या घरात सोनाली, विकास आणि विशाल एकमेकांशी छान गप्पा मारत असतात. याच गप्पांमध्ये त्यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळतं.  "खूपदा असं वाटलं की इतक्या जोरजोराने ओरडवं, रडावं..पण तरीसुध्दा खूप छान स्माईल करून त्या गोष्टीला सामोरं गेले मी", असं सोनाली म्हणते. त्यावर विशाल त्यावर हसत म्हणाला, "एवढं सिरियस सांगते, बावळट आहे का? मी तेच ऐकतो आहे आणि बघतो आहे." 

सोनाली विकासला म्हणाली, "नको involve करूस त्याला आपल्यामध्ये". आणि, इथून दोघांमध्ये पुन्हा वाद सुरु होतो. विशाल म्हणाला, "तिकडे जाऊन बसा मग. तू आली आहेस इथे... आमच्यामध्ये आली आहेस. तू आमच्यामध्ये involve झाली आहेस, एमएलए नाही involve करत आहेस."

"विकास झोपतोय त्यामुळे मी त्याला सांगते", असं सोनाली म्हणते. त्यावर,"बोलण्याची पध्दत असते ना... असं नाही बोलू शकतं. ठीक आहे असू दे... चुकीच बोलीस तू पण मी तुला माफ केलं..", असं विशाल म्हणतो. 
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विशाल आणि सोनाली यांच्यात सातत्याने शाब्दिक वाद होत आहेत. इतकंच नाही तर विशालने सोनाली, विकास यांचा ग्रुपही सोडला आहे. आता तो कोणत्याच ग्रुपचा भाग नाही असं त्याने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. 
 

Web Title: bigg boss marathi 3 sonali patil and vishal nikam new argument