Bigg boss marathi 3:जो जिता वही सिकंदर ! शेवटच्या कॅप्टन्सी कार्यात मीरा- गायत्रीमध्ये होणार जोरदार मारामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 01:00 PM2021-12-10T13:00:00+5:302021-12-10T13:00:00+5:30

Bigg boss marathi 3: घरात रंगणाऱ्या शेवटच्या कॅप्टन्सी कार्यात जय VS विशाल तर गायत्री VS मीरा बघायला मिळणार आहे.

bigg boss marathi 3 last captaincy task between meera and gayatri | Bigg boss marathi 3:जो जिता वही सिकंदर ! शेवटच्या कॅप्टन्सी कार्यात मीरा- गायत्रीमध्ये होणार जोरदार मारामारी

Bigg boss marathi 3:जो जिता वही सिकंदर ! शेवटच्या कॅप्टन्सी कार्यात मीरा- गायत्रीमध्ये होणार जोरदार मारामारी

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत राहिलेल्या बिग बॉस मराठीचं तिसरं  (bigg boss marathi 3) पर्व आता हळूहळू ग्रँड फिनालेकडे येऊ लागलं आहे. आतापर्यंत या घरात अनेक कार्य, कॅप्टन्सी टास्क पार पडले. या प्रत्येक कार्यात घरातील सदस्यांमध्ये वादविवाद, हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, यावेळी या पर्वातील शेवटचं कॅप्टन्सी कार्य (last captaincy task)  पार पडणार आहे. विशेष म्हणजे या शेवटच्या कार्यात एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असलेल्या मीरा (meera jagannath) आणि गायत्रीमध्ये (gayatri datar) मारामारी होणार आहे. 

लवकरच बिग बॉसच्या घरात 'जो जिता वही सिकंदर' हे नवीन आणि शेवटचं कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. या कार्यात पात्र सदस्यांसोबत अपात्र सदस्यांनाही उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे या कार्यात जिंकण्यासाठी प्रत्येकामध्ये चढाओढ लागणार आहे.  यात जय VS विशाल तर गायत्री VS मीरा बघायला मिळणार आहे. तर इतर सदस्यदेखील एकमेकांच्या विरोधात खेळणारच. यामध्ये कोण विजयी ठरणार आज कळेलच.
 
सध्या सोशल मीडियावर या शेवटच्या टास्कचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये गायत्री आणि मीरा यांच्यात चांगली मारामारी होतांना दिसत आहे. अलिकडेच गायत्रीच्या हाताला झालेली दुखापत बरी झाली होती. मात्र, प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर गायत्री पुन्हा एकदा त्याच जोमाने हे कार्य पार पाडतांना दिसणार आहे. त्यामुळे घरात रंगणाऱ्या या टास्कमध्ये आता मीरा VS गायत्री या दोघींपैकी कोण बाजी मारणार? त्यांच्यातील वाद आणखी कुठपर्यंत जाणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: bigg boss marathi 3 last captaincy task between meera and gayatri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.