उत्कर्षच्या एका निर्णयामुळे पडणार मैत्रीत फूट; Bigg boss च्या घरात जयच्या अश्रुंचा फुटला बांध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 14:58 IST2021-11-11T14:57:29+5:302021-11-11T14:58:01+5:30
Bigg boss marathi 3: बिग बॉस उत्कर्षला एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार देणार आहेत. त्याच्या निर्णयामुळे जयच्या डोळ्यात पाणी येणार आहे.

उत्कर्षच्या एका निर्णयामुळे पडणार मैत्रीत फूट; Bigg boss च्या घरात जयच्या अश्रुंचा फुटला बांध
सध्या रंगतदार वळणावर पोहोचलेला रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी(bigg boss marathi 3). सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून आता घरातील प्रत्येक स्पर्धक हा शो जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच बिग बॉस घरातील स्पर्धकांना ज्या पद्धतीचे टास्क देत आहे. ते पाहता अनेक सदस्यांमध्ये जोरदार भांडण होतांना दिसत आहेत. यामध्येच आता बिग बॉस उत्कर्षला एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार देणार आहेत. ज्यामुळे त्याला कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. इतकंच नाही तर त्याच्या निर्णयामुळे जयच्या डोळ्यात पाणी येणार आहे.
बिग बॉसच्या घरात आज रंगणाऱ्या टास्कमध्ये घरातील सदस्यांच्या मैत्रीची कस लागणार आहे. आज विशाल आणि जयमध्ये कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. यात उत्कर्षला बिग बॉस एक अधिकार देणार आहेत. ज्यात त्याला कॅप्टन पदाच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी त्याची एक गोष्ट गमवावी लागणार आहे. विशेष म्हणजे उत्कर्ष जी गोष्ट निवडणार आहे. त्यामुळे जयच्या डोळ्यात पाणी येणार आहे.
दरम्यान, उत्कर्षने असा कोणता निर्णय घेतल्या ज्यामुळे जयच्या डोळ्यात पाणी आलं. तसंच उत्कर्षने नेमकं काय गमावलं आहे या सगळ्याची उत्तरं प्रेक्षकांना आजच्या भागात मिळणार आहेत.