Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता शिगेला, महेश मांजरेकरांनी शेअर केला प्रोमो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 12:11 IST2021-06-21T12:09:30+5:302021-06-21T12:11:43+5:30
बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे.

Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता शिगेला, महेश मांजरेकरांनी शेअर केला प्रोमो
बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सिझन सगळे गाजले आहेत. आता या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. या कार्यक्रमाचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीच सोशल मीडियाद्वारे या गोष्टीविषयी सांगितले आहे.
महेश मांजरेकर यांनी या कार्यक्रमाचा टीझर शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार राहा… #BiggBossMarathi3 लवकरच #ColorsMarathi वर असे त्यांनी या पोस्टसोबत लिहिले आहे. त्यांची ही पोस्ट वाचून बिग बॉसचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. आम्ही आतुरतेने या सिझनची वाट पाहत आहोत असे लोक सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.
बिग बॉस या कार्यक्रमाच्या या सिझनची घोषणा झाल्यानंतर आता या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी असणार याची उत्सुकता या कार्यक्रमाच्या चाहत्यांना लागलेली आहे.