Bigg Boss Marathi 3, Episodes, 23 Nov: जय विकासवर आली मासे विकायची वेळ; बिग बॉसच्या घरात भरलाय मासळी बाजार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 12:19 IST2021-11-23T12:18:45+5:302021-11-23T12:19:20+5:30
Bigg Boss Marathi 3: कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात मासळी बाजार भरणार असल्याचं दिसून येत आहे.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 23 Nov: जय विकासवर आली मासे विकायची वेळ; बिग बॉसच्या घरात भरलाय मासळी बाजार?
बिग बॉस मराठीचं तिसरं (Bigg Boss Marathi) पर्व सध्या रंगतदार वळणावर येऊन पोहोचलं आहे. अलिकडेच या घरात नॉमिनेशन एक्स्प्रेस हे कार्य पार पडलं. या कार्यात मीरा, सोनाली, विकास, मीनल आणि दादूस हे घरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या पैकी आता कोणत्या सदस्याचा या घरातील प्रवास संपणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यामध्येच आज घरात एक भन्नाट टास्क रंगणार आहे. परंतु, या टास्कमध्ये घरात मासळी बाजार भरणार असल्याचं दिसून येत आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात मासळी बाजार भरणार असल्याचं दिसून येत आहे. "पापलेट आहे, बांगडा आहे आणि सारंगी पण आहे", असं विकास जोरजोरात ओरडत असून त्याचे मासे विकत आहे. सोबत जय प्रचंड भावाने मासे विकत असल्यामुळे "आता तर बँकेत जाऊन कर्ज काढतो", असं विशाल म्हणतो.
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात आता हा मासळी बाजार नेमका कशाप्रकारे भरणार? घरातील स्पर्धकांमध्ये पुन्हा राडे होणार का? हे आजच्या भागात प्रेक्षकांना उलगडणार आहे.