bigg boss marathi 3 : तर सरळ भावाला घरी घेऊन जा...,भाऊ उत्कर्षला सपोर्ट करणारा आदर्श शिंदे झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 11:31 AM2021-10-05T11:31:52+5:302021-10-05T11:33:34+5:30

Bigg Boss Marathi 3 : गेल्या शनिवारच्या स्पेशल एपिसोडमध्ये महेश मांजरेकर आले आणि त्यांनी उत्कर्ष शिंदेचा क्लास घेतला. मग काय, उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे त्याच्या समर्थनार्थासाठी पुढे सरसावला...

bigg boss marathi 3 adarsh shinde supports brother utkarsh shinde after bigg bosschi chawadi gets trolled | bigg boss marathi 3 : तर सरळ भावाला घरी घेऊन जा...,भाऊ उत्कर्षला सपोर्ट करणारा आदर्श शिंदे झाला ट्रोल

bigg boss marathi 3 : तर सरळ भावाला घरी घेऊन जा...,भाऊ उत्कर्षला सपोर्ट करणारा आदर्श शिंदे झाला ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्देमिरचीची धुरी दिली जात असताना तू ते थांबवलंस का? मिठाच्या पाण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. तू सर्वात वाईट व पक्षपाती संचालक असल्याचं मांजरेकर म्हणाले होते.

बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन (Bigg Boss Marathi 3 )सध्या चांगलाच चर्चा आहे. सर्वाधिक चर्चा आहे ती चावडीची. होय, शोचे होस्ट महेश मांजरेकर चावडीवर येतात आणि स्पर्धकांची शाळा घेतात. गेल्या दोन आठवड्यांत मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar)अनेक स्पर्धकांची शाळा घेतली. गेल्या शनिवारच्या स्पेशल एपिसोडमध्ये महेश मांजरेकर आले आणि त्यांनी उत्कर्ष शिंदेचा  ( Utkarsh Shinde) क्लास घेतला. टास्कदरम्यान उत्कर्षनं पक्षपात केला, असं म्हणत त्यांनी त्याला सुनावलं. मग काय, उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे (Adarsh Shinde) त्याच्या समर्थनार्थासाठी पुढे सरसावला.

आदर्शने त्याच्या सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर करत भावाला सपोर्ट केला. ‘बिग बॉस’ची चावडीच डबल ढोलकी, अशा आशयाची पोस्ट त्यानं शेअर केली. ‘विशालने कॅप्टन्सी टास्कमध्ये उत्कर्ष यांना मदत केली म्हणून उत्कर्षनीही परतफेड म्हणून विशालला नॉमिनेशन प्रक्रियेत सेफ केलं. पण चावडीला हा फेअर गेम दिसला नाही,’अशा आशयाची पोस्ट आदर्शने शेअर केली.
पण त्याची ही पोस्ट बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना फार काही रूचली नाही असे दिसतेय. होय, कारण या पोस्टमुळे आदर्श चांगलाच ट्रोल होतोय. अनेक चाहत्यांनी भावाची बाजू घेणा-या आदर्शला चांगलचं सुनावलं.

बिग बॉसपेक्षा तुम्ही मोठे नाहीच. एवढा राग येतो तर बिगबॉसमध्ये गेलात कशाला? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. तुला इतका राग येत असेल तर सरळ भावाला घरी घेऊन जा. आम्ही काय आंधळे नाही, असं एका चाहत्याने आदर्शला सुनावलं.

नाचता येईना, अंगण वाकडं, म्हणे चावडी डबल ढोलकी, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. ह्या अशा डबल ढोलकी पोस्टमुळे आता त्याला जी काय मतं मिळाली असती ती पण बोंबलली, अशी कमेंट एका चाहत्याने केली.
  
मांजरेकरांनी का घेतली होती उत्कर्षची शाळा

 गेल्या आठवड्यात सपर्धकांना ‘हल्लाबोल’ हा टास्क देण्यात आला होता. यादरम्यान पहिल्या टीमचे सदस्य बाईकवर बसलेले असताना त्यांना बाईकवरुन उठवण्याचं काम दुस-या टीमकडे होतं. यावेळी दुस-या टीममधील गायत्री आणि जय यांनी मिरचीची धुरी तयार करत पहिल्या टीमच्या सदस्यांना जागेवरुन उठवण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्यावेळी दुस-या टीमची हा टास्क करण्याची वेळ आली तेव्हा जय आणि गायत्री हे बाईकवर बसले होते. यावेळी पहिल्या टीममधील सदस्य सोनालीने मिठाचं पाणी तयार करुन त्यांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला असता टास्कचा संचालक उत्कर्षने तिच्या हातातली मिठाच्या पाण्याची बाटली खेचून घेतली होती.
उत्कर्षचं हे वागणं महेश मांजरेकर यांना खटकलं होतं. समुद्रात पोहायला गेलास तेव्हा कधी त्रास झालाय का तुला? असा प्रश्न मांजरेकर यांनी उत्कर्षला विचारला होता.  मिरचीची धुरी दिली जात असताना तू ते थांबवलंस का? मिठाच्या पाण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. तू सर्वात वाईट व पक्षपाती संचालक असल्याचं मांजरेकर म्हणाले होते.
 

Web Title: bigg boss marathi 3 adarsh shinde supports brother utkarsh shinde after bigg bosschi chawadi gets trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.