Veena Jagatap : 'बिग बॉस मराठी 2' फेम वीणा जगतापची नवी इनिंग, अभिनयाला ठोकणार कायमचा रामराम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 12:25 IST2023-02-20T12:23:56+5:302023-02-20T12:25:21+5:30

Veena Jagatap : वीणा जगताप पुन्हा चर्चेत आली आहे. अर्थात एका वेगळ्याच कारणानं. होय, वीणाने एका नवीन क्षेत्रात प्रवेश केल्याचं दिसतंय.

bigg boss marathi 2 fame veena jagtap certificate as professional makeup artist | Veena Jagatap : 'बिग बॉस मराठी 2' फेम वीणा जगतापची नवी इनिंग, अभिनयाला ठोकणार कायमचा रामराम?

Veena Jagatap : 'बिग बॉस मराठी 2' फेम वीणा जगतापची नवी इनिंग, अभिनयाला ठोकणार कायमचा रामराम?

बिग बॉस मराठी 2 मध्ये शिव ठाकरे ( Shiv Thakare ) आणि वीणा जगताप (Veena Jagatap ) यांचं प्रेम बहरलं होतं. इतकं की, शिवनं वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. वीणानेही शिवच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला होता. बिग बॉस मराठी संपल्यावर हे लव्ह बर्ड्स घराबाहेर आलेत आणि काहीच महिन्यांत काहीतरी बिनसलं. नेमकं काय बिनसलं हे कळायला मार्ग नाही. पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी चर्चेत आली. वीणानं शिवसोबतचे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले अगदी त्याच्या नावाचा टॅटूही पुसला. आता ही वीणा पुन्हा चर्चेत आली आहे. अर्थात एका वेगळ्याच कारणानं. होय, वीणाने एका नवीन क्षेत्रात प्रवेश केल्याचं दिसतंय.

काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करत वीणाने चाहत्यांना ती नवीन क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याचे संकेत दिले होते. वीणाने एक फोटो शेअर केला होता ज्यात ती एका मॉडेलच्या चेहऱ्याला मेकअप करताना दिसली होती. 'मी माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला आशा आहे की ते चांगलं होईल', असं वीणानं म्हटलं होतं. आता तिने याबाबत एक मोठी घोषणा वीणाने केली आहे.

वीणा जगताप आता एक मेकअप आर्टिस्ट झाली आहे. नुकतंच तिला याचं प्रमाणपत्र देखील मिळालं आहे.याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे.  'तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुम्ही कधीही शिकू शकता..त्यामुळे शिकणं कधीही थांबवू नका.. कारण जीवन कधीही शिकवणं थांबवत नाही...', असं तिने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

वीणा आता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट झाली आहे. त्यामुळे आता ती अभिनयाला रामराम ठोकून याच क्षेत्रात पुढे वाटचाल करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अद्याप वीणाने याबद्दलन काहीही स्पष्ट केलेलं नाही. आता येत्या दिवसांत वीणा कोणती नवी घोषणा करते ते बघूच.
वीणा जगताप बऱ्याच दिवसांपासून मालिका आणि चित्रपटांतुन गायब आहे. स्टार प्रवाहावरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत ती शेवटची दिसली होती.  

Web Title: bigg boss marathi 2 fame veena jagtap certificate as professional makeup artist