"...म्हणून मी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला", 'बिग बॉस' फेम सपना चौधरीचा धक्कादायक खुलासा, काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 10:34 IST2025-08-12T10:31:47+5:302025-08-12T10:34:50+5:30
"...म्हणून मी स्वत:चं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला", सपना चौधरीचा खुलासा, त्या प्रसंगाविषयी सांगत म्हणाली....

"...म्हणून मी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला", 'बिग बॉस' फेम सपना चौधरीचा धक्कादायक खुलासा, काय घडलेलं?
Sapna Chaudhary: सुप्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. सपना चौधरी ही सलमान खानच्या 'बिग बॉस' हिंदीच्या ११ व्या पर्वातून चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. सपनाचा चाहतावर्गही मोठा आहे. हरियाणवी गाण्यांवरचे तिचे स्टेज शो प्रचंड गर्दी करतात.सपना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमध्ये तिने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगावर भाष्य केलं आहे.
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सपनाने तिला अभिनय प्रवासात आलेल्या कटू अनुभावांविषयी सांगितलं. त्यावेळी ती म्हणाली, "माझा सपना ते सपना मॅडम बनण्यापर्यंतचा प्रवास फार सोपा नव्हता. या प्रवासात मला लोकांकडून प्रेमही मिळालं, वाईट शब्दही ऐकावे लागले. काहींनी कौतुक केलं तर काहीजण माझ्याबद्दल वाईटही बोलले."
त्यानंतर पुढे ती म्हणाली, "ही साधारण २०१६ ची गोष्ट आहे. त्यावेळी लोक मी एक डान्सर असल्यामुळे माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. लोकांनी माझ्यावर वाईट कमेंट केल्या आणि मी हे सगळं सहन करू शकले नाही म्हणून मी स्वत: चं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मी काही दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला जाणवलं की भले काही लोक माझा द्वेष करत असतील, तरी माझ्यावर प्रेम करणारेही बरेच आहेत. त्यावेळी एक मुलगा मी बरी होईपर्यंत रुग्णालयाबाहेर उभा होता. तेव्हा मला जाणवलं की परिस्थिती इतकी वाईट नव्हती की मी आत्महत्येचा विचार करावा. यामुळे मला जगण्याची प्रेरणा मिळाली." असा खुलासा तिने या मुलाखतीत केला.
मीडिया रिपोर्टनुसार, दरम्यान, लवकरच सपना चौधरी जीवनावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचं दिग्दर्शन महेश भट करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सपनाने 'वीरे की वेडिंग' या चित्रपटात 'हट जा तौ' या स्पेशल डान्स नंबरद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ती अभय देओल स्टारर 'नानू की जानू' या चित्रपटातील 'लव्ह बाइट' आणि 'तेरे ठुमके सपना चौधरी' या गाण्यांमध्ये दिसली होती.