Bigg Boss Marathi 4 Finale: अपूर्वा, किरण माने आणि अक्षय केळकरमधून 'हा' सदस्य पडला बाहेर, उरले फक्त 'टॉप २' सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 10:40 PM2023-01-08T22:40:05+5:302023-01-08T22:41:59+5:30

टॉप ३ नंतर आता टॉप २ स्पर्धकांची नावंही समोर आली आहेत. अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने यांच्यातून सातारच्या बच्चनला बाहेर जावे लागले.

bigg-boss-grand-finale-kiran-mane-out-of-the-house-got-top-2-contestants | Bigg Boss Marathi 4 Finale: अपूर्वा, किरण माने आणि अक्षय केळकरमधून 'हा' सदस्य पडला बाहेर, उरले फक्त 'टॉप २' सदस्य

Bigg Boss Marathi 4 Finale: अपूर्वा, किरण माने आणि अक्षय केळकरमधून 'हा' सदस्य पडला बाहेर, उरले फक्त 'टॉप २' सदस्य

googlenewsNext

Bigg Boss Marathi 4 Finale: बिग बॉस मराठी ४ चा विजेता किंवा विजेती कोण होणार याची उत्सुकता आता आणखी ताणत चालली आहे. टॉप ३ नंतर आता टॉप २ स्पर्धकांची नावंही समोर आली आहेत. अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने यांच्यातून सातारच्या बच्चनला बाहेर जावे लागले. आता अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर यांच्यातून एक बिग बॉस ४ चा विजेता होणार आहे. 

किरण माने बाहेर पडल्याने खरं तर चाहत्यांना धक्काच बसला आहे. अनेकांना किरण मानेच विजेता होणार असा विश्वास होता. मात्र तसे होऊ शकले नाही. बाहेर पडताना किरण माने म्हणाले, 'खेळताना मजा आली , मी कोणाची पर्वा न करता खेळलो. मी ज्या परिस्थितीत आतमध्ये आलो होतो खरा किरण माने कसा आहे हे लोकांना कळू दे म्हणून मी आलो होतो, नंतर नंतर खेळाचीच मजा वाटायला लागली.' 

आता अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर यांच्यातील एक विजेता किंवा विजेती होणार आहे. त्यामुळे दोघांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. दोघांच्याही मनात जशी धाकधुक आहे तशीच चाहत्यांनाही कोण जिंकणार याची धाकधुक लागली आहे.

Web Title: bigg-boss-grand-finale-kiran-mane-out-of-the-house-got-top-2-contestants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.