Shiv Thakare : शिव ठाकरेची नवीकोरी कार, कुटुंबासह मारला फेरफटका; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 09:21 AM2023-04-16T09:21:55+5:302023-04-16T09:22:37+5:30

अमरावतीचा वाघ शिव ठाकरेने सोशल मीडियावर कार घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

bigg boss fame Shiv Thackeray new car aai seems happy family video | Shiv Thakare : शिव ठाकरेची नवीकोरी कार, कुटुंबासह मारला फेरफटका; Video व्हायरल

Shiv Thakare : शिव ठाकरेची नवीकोरी कार, कुटुंबासह मारला फेरफटका; Video व्हायरल

googlenewsNext

महाराष्ट्राचा लाडका 'बिग बॉस' फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) कायम चर्चेत असतो. मराठी असो किंवा हिंदी दोन्ही बिग बॉसमध्ये त्याने आपला डंका गाजवला. त्याच्या चाहत्यावर्गात कमालीची वाढ झाली. शिवच्या आईला त्याचा खूप अभिमान वाटतो. शिवने नुकतीच नवीन कार घेतली आहे. त्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. यामध्ये शिवची आई भलतीच आनंदी झालेली दिसत आहे. शिवच्या चाहत्यांमध्ये हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

अमरावतीचा वाघ शिव ठाकरेने सोशल मीडियावर कार घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले,'गणपती बाप्पा मोरया. दोन सेकंड कारनंतर माझी पहिलीच नवी कार. याला धक्का द्यायचं टेन्शनच नाही!'

शिवने tata harrier ही कार खरेदी केली. त्याच्या आईने नवीन कारची पूजा केली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वकाही सांगून जात होतो. यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब आनंदात सहभागी होतं. शिवची आई कायमच त्याचा आधारस्तंभ राहिली आहे. 

संपूर्ण कुटुंबाने कारमधून फेरफटका मारला त्याचा व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आता कारचं प्लास्टिक काढणार...सफर शुरु असं कॅप्शनही त्याने दिलं आहे. शिव सध्या नवीन रिअॅलिटी शो मध्ये दिसतोय. 'एंटरटेन्मेंट की रात हाऊसफुल' या कलर्सच्या शो मध्ये तो दिसणार आहे. रुबिना दिलाईक, अर्चना गौतम हे देखील या शोचा भाग असणार आहेत. तसंच शिव 'खतरो के खिलाडी' मध्येही बघायला मिळणार आहे. 

Web Title: bigg boss fame Shiv Thackeray new car aai seems happy family video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.