'बिग बॉस' फेम दलजित कौर करणार 'या' क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्या याबद्दल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 17:32 IST2021-04-17T17:25:38+5:302021-04-17T17:32:18+5:30
अभिनेत्री दलजित कौर बिग बॉसच्या तेराव्या पर्वात सहभागी झाली होती

'बिग बॉस' फेम दलजित कौर करणार 'या' क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्या याबद्दल!
अभिनेत्री दलजित कौर बिग बॉसच्या तेराव्या पर्वात सहभागी झाली होती.कुलवधूमधील नियती, इश्य प्यार को क्या नाम दून मधील अंजली तर काझी टीका मधील मंजिरीचं पात्रदेखील दलजीतनं साकारलं होतं. दलजीतने 2009 मध्ये टीव्ही अभिनेता शालीन भनोतसोबत लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार फार काळ टीकला नाही. दलजीतनं आपल्या पतीवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप लावले होते.अखेर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दलजितनं गुड्डन तुमसे ना हो पायेगा ही शेवटची मालिका केली होती. त्यात तिनं नकारात्मक भूमिका साकरली होती .त्यानंतर आता ती लवकरच पंजाबी म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे.
या व्हिडीओमधून दिलजीत कौर पंजाबी संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहेत. या व्हिडीओमध्ये केवळ ती अभिनयच करणार नसून या व्हिडीओची संकल्पना व निर्मितीही तिच करते आहेत. तिच्यासोबत उमर रियाझ झळकणार आहे. या गाण्यातून शुभम गार्ग आणि वर्तिका हे दोन नवीन चेहरे देखील पहायला मिळतील.