Mira Jagannath : ऐकलं का? ‘या’ लोकप्रिय मालिकेत होतेय ‘बिग बॉस’ लेडी मीरा जगन्नाथची एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 11:58 IST2022-08-21T11:56:26+5:302022-08-21T11:58:07+5:30

Mira Jagannath : ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता टीव्हीवर कमबॅक करतेय. होय, बिग बॉस मराठीचं घर हादरवून टाकणारी मीरा आता पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Bigg Boss Fame Actress Mira Jagannath new entry in Aai Kute Kay Karte Serial | Mira Jagannath : ऐकलं का? ‘या’ लोकप्रिय मालिकेत होतेय ‘बिग बॉस’ लेडी मीरा जगन्नाथची एन्ट्री!!

Mira Jagannath : ऐकलं का? ‘या’ लोकप्रिय मालिकेत होतेय ‘बिग बॉस’ लेडी मीरा जगन्नाथची एन्ट्री!!

बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ ( Mira Jagannath )आता टीव्हीवर कमबॅक करतेय. होय, बिग बॉस मराठीचं घर हादरवून टाकणारी मीरा आता पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्रीनं स्वत: सोशल मीडियावर क्विझ शेअर करत ही माहिती दिली आहे. ‘माझा नवी प्रोजेक्ट कोणता असेल?’, असा प्रश्न विचारत मीरानं चाहत्यांना तीन ऑप्शन्स दिले होते. ज्यात पहिला ऑप्शन  चित्रपट, दुसरा  सीरिअल आणि तिसरा वेब सीरिज' होता. त्यातील दुसरा सिरीयल हा ऑप्शन बरोबर होता. यावरुनचं मीरानं ती टेलिव्हिजनवर कमबॅक करत असल्याचं कन्फर्म झालं आहे.

अर्थात मीराची नवी मालिका कोणती असेल? याबद्दल माहिती मिळाली नव्हती. पण आता त्याबद्दलची माहितीही समोर आलीये.

चर्चा खरी मानाल तर ‘आई कुठे काय करते’ (Aai Kute Kay Karte) या लोकप्रिय मालिकेत मीरा जगन्नाथची एन्ट्री होणार आहे. अरुंधती, अनिरुद्धच्या नात्याची गोष्ट असलेल्या या मालिकेत आजपर्यंत अनेक नव्या पात्रांनी एन्ट्री झाली आहे. ताज्या माहितीनुसार, लवकरच मीरा जगन्नाथची या मालिकेत एण्ट्री होणार आहे.   

सध्या मालिकेत कांचन आणि आप्पा यांच्यात वाद सुरू आहेत. देशमुखांचं संपूर्ण कुटुंब हे आशुतोषच्या बाजूने झालं आहे. पण कांचन यांना मात्र ही गोष्ट खटकत आहे. दुसरीकडे ईशाच्या आयुष्यात नव्या मुलाची एन्ट्री झाली आहे. हा मुलगा म्हणजे आशुतोषचा जवळचा नातेवाईक आहे. अशात आता या मालिकेत   मीरा जगन्नाथ ही नव्या पात्रात दिाणार असल्याचं कळतंय. अर्थात याबद्दलचा अधिकृत खुलासा झालेला नाही. 
मीरा ‘येऊ कशी मी नांदायला’  मालिकेत मोमो या भूमिकेत दिसली होती. तिची ही मोमोची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर मीराने ‘बिग बॉस मराठी3’मध्ये धुमाकूळ घातला होता.  

Web Title: Bigg Boss Fame Actress Mira Jagannath new entry in Aai Kute Kay Karte Serial